Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात
By प्रविण मरगळे | Published: October 20, 2020 01:39 PM2020-10-20T13:39:52+5:302020-10-20T13:41:12+5:30
CM BS Yediyurappa News: येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे
बंगळुरु - कर्नाटकमधील भाजपाचे आमदार बसनगौडा पी यतनाल यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करत राज्यात मुख्यमंत्री बदलासाठी आघाडी उघडली आहे. राज्यातील विजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार यतनाल यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. राज्यातील बहुतांश नेते मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर समाधानी नाही असा दावा त्यांनी केला आहे.
येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे. यतनाल म्हणाले, राज्याचे बहुतेक वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर खूश नसल्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलले जातील, पुढचे मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचे असतील असं पीएम मोदींनीही म्हटलं आहे. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री बनले असून उत्तर कर्नाटकातील १०० आमदारांनी त्यांना ते पद दिलं आहे असा दावा त्यांनी केला.
CM to be changed soon as most of senior leaders in state are not happy with BS Yediyurappa. PM Modi also said that next CM will be from North Karnataka. Yediyurappa became CM because of us, North Karnataka ppl gave 100 MLAs which made him CM:BJP MLA Basangouda P Yatnal. (19.10) pic.twitter.com/88DK1SYq5j
— ANI (@ANI) October 20, 2020
येडियुरप्पा यांच्या कामावर उत्तर कर्नाटकचे आमदार संतप्त
कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर डी कुमारस्वामी यांचे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्याने तयार झाले. पण नंतर सरकारमध्ये सहभागी झालेल्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत पक्षांतर केल्यानं कुमारस्वामी सरकार कोसळलं, राज्यात भाजपाचं सरकार आलं. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री केले गेले होते, परंतु भाजपाचा एक मोठा गट येडियुरप्पा यांच्यावर बऱ्याच काळापासून नाराज आहे असं बोललं जातं.
सहा महिन्यापूर्वीही येडियुरप्पा यांच्याविरोधात २० आमदारांनी मोर्चा उघडला होता. नाराज असलेल्या आमदारांनी उमेश कत्ती यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची मागणी केली होती. कत्ती हे आठवेळा आमदार राहिलेले आहेत. याशिवाय उमेश कत्ती यांचे भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेवर पाठविण्याच यावे अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केली होती. मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जरी राज्यसभेचे वृत्त फेटाळले असले तरीही उमेश कत्ती यांनी भेटीचे कारण जगजाहीर केले आहे. येडीयुराप्पांनी माझ्या भावाला राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. याचीच आठवण करून देण्यासाठी रमेश कत्ती येडियुराप्पांना भेटण्यासाठी गेले होते, असे उमेश कत्ती म्हणाले होते.