"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:29 AM2021-08-09T08:29:19+5:302021-08-09T08:30:29+5:30

Khel Ratna Award: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

"... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna | "...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

"...हा तर राजकीय खेळ", खेलरत्नच्या नामांतरावरून शिवसेनेने मोदी सरकारला फटकारले

Next

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांवर नाव कोरले जात असतानाच मोदी सरकारने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामांतर केले. या नामांतराची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनभावनेचा आदर करत हे नामांतर केल्याचा दावा केला होता. दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याच्या निर्णयावरून शिवसेनेने सामनातील अग्रलेखामधून नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.("... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna)

सामनातील आजच्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. राजीव गांधी यांनाही दहशतवादी हल्ल्याचे बळी व्हावे लागले. या दोघांच्या राजकीय विचारांशी मतभेद असू शकतात. लोकशाहीमध्ये मतभेदांना स्थान आहे. पण देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असणाऱ्या पंतप्रधानांचे बलिदान हा चेष्टेचा विषय ठरू शकत नाही. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करणे ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ आहे. राजीव गांधी यांच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता आला असता. भारताने ती परंपरा आणि संस्कृती गमावली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने देशात सुवर्णक्षणाचा उत्सव सुरू असतानाच केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला आहे. या खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत. खेलरत्न हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आतापर्यंत अनेक खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे. मात्र कुणीही राजीव गांधी यांचे नाव असलेला हा पुरस्कार नको असल्याचे दिसत नाही. मात्र टोकियोमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकताच मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करणे हे अनाकलनीय आहे, अशी टीका सामनामधील अग्रलेखातून करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे आहे. ते एक उत्तम व्यक्ती होते. तसेच पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचे नाव पुसून तेथे ध्यानचंद यांचे नाव लावणे हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असेही मानता येणार नाही. राजीव गांधींचे नाव नको म्हणून ध्यानचंद यांचे नाव देणे हे द्वेशाचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीकाही शिवसेनेने केली.  

Web Title: "... This is a political game", Shiv Sena slammed the Modi government for name Changing Khel Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.