Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

By प्रविण मरगळे | Published: February 24, 2021 10:45 AM2021-02-24T10:45:58+5:302021-02-24T10:48:56+5:30

Shiv Sena Sanjay Raut Target BJP: महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

Politics: BJP Starts Operation lotus in Maharashtra in March-April?; Shiv Sena warning to BJP | Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

Maharashtra Politics: मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; शिवसेनेचा भाजपाला गंभीर इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाहीलोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेलशिवसेना घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे,

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुडुचेरीमध्ये काँग्रेसला(Congress) मोठा धक्का बसला, याठिकाणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, मात्र या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपाला(BJP) गंभीर इशारा दिला आहे.(Shivsena Sanjay Raut Statements on BJP Opertation Lotus)

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पुडुचेरीसारखे(Puducherry) छोटे राज्यसुद्धा भाजपानं काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे,  याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत, येथे शिवसेना(Shivsena) घटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असं त्यांनी बजावलं आहे,

तसेच दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.

आपला माणूस असला तरी कारवाई करतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय झालं? हे माहिती नाही, पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली, नियमांचे उल्लंघन झालं त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात कारवाई करण्याचे आदेश दिलेत, आपला माणूस असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोडणार नाही, मुख्यमंत्री कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खूपच कठोर आहेत. कायदा आपला काम करेल, संजय राठोडबाबत जे काही वक्तव्य आहे ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करू शकतात असं सांगत संजय राठोड प्रकरणात जास्त भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्याचसोबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र नेहमी होत असतं, परंतु आम्हीदेखील सक्षम आहोत, त्यांना टक्कर द्यायला असंही राऊतांनी म्हटलं आहे.   

Web Title: Politics: BJP Starts Operation lotus in Maharashtra in March-April?; Shiv Sena warning to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.