राजकारण फक्त निवडणुकीपुरते’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 'कानपिचक्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:06 AM2021-08-22T06:06:26+5:302021-08-22T06:06:56+5:30
डॉ. राहुल पंडित यांच्यासह ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजकारण निवडणुकीपुरते ठीक; पण इतर वेळी मतभेद विसरून समाजासाठी काम करणे गरजेचे आहे, तरच लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार आपल्याला उरतो, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ३५ जणांना ‘महाराष्ट्र जन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यपाल म्हणाले, चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्यास त्यांना बळ मिळते. सत्कारमूर्तींमध्ये कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकारिता, समाजसेवा, राजकारण आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेक रत्ने घडविली आणि यापुढेही घडवीत राहील, यात शंका नाही. माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले की, मी आजवरच्या माझ्या राजकीय कारकीर्दीत अनेक राज्यपाल पाहिले; पण जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे भगतसिंग कोश्यारी हे पहिलेच. त्यामुळेच लोकप्रिय राज्यपाल म्हणून त्यांचा लौकिक आहे.
महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार विजेते
‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, अभिनेता अनुप सोनी, अभिनेत्री अर्चना शर्मा, पद्मश्री डॉ. अशोक गुप्ता, भूषण महाजन, डॉ. दीपक नामजोशी, डॉ. दीपक पाटकर, अकोल्याचे माजी आमदार गजानन दाळू, डॉ. जी. पी. रत्नपारखी, आमदार गोपीकिशन बाजोनिया, माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा, पद्मश्री हरिहरन अनंतसुब्रमणी, डॉ. हुझैफा खोराकीवाला, डॉ. कमल जांगीड, मंजू लोढा, डॉ. मिन्नी बोधनवाला, मार्विन फर्नांडिस, मोनिषासिंग कटियाल,
डॉ. नीरज मर्के, माजी आमदार प्रदीप वडनेरे, डॉ. प्रवीण कहळे, राहुल कराड, डॉ. राहुल पंडित, डॉ. कर्नल राजेश आढाव, आमदार राजेश एकडे, रवी दुबे, ॲड. रुबिना रिझवी, डॉ. समीर सदावर्ते, संग्राम सिंग, सुदेश भोसले, माजी आमदार सुहास तिडके, स्वप्नील माने, डॉ. वृषाली माने, डॉ. अमजदखान पठाण.