राजकारणासाठी हिरावला मुलांच्या तोंडातला घास, शालेय पोषण आहाराचे वाटप थांबलेे   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:01 AM2021-05-24T10:01:27+5:302021-05-24T10:02:18+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून रखडले आहे. आपल्याच कार्यकर्त्याला हे टेंडर मिळावे यासाठी हे दोन्ही नेते जिद्दीला पेटले आहेत.

For politics, stopped distributing school nutrition to the children | राजकारणासाठी हिरावला मुलांच्या तोंडातला घास, शालेय पोषण आहाराचे वाटप थांबलेे   

राजकारणासाठी हिरावला मुलांच्या तोंडातला घास, शालेय पोषण आहाराचे वाटप थांबलेे   

Next

अहमदनगर : जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून रखडले आहे. आपल्याच कार्यकर्त्याला हे टेंडर मिळावे यासाठी हे दोन्ही नेते जिद्दीला पेटले आहेत. त्यामुळे डिसेंबरपासून शालेय पोषण आहाराचे वाटप रखडलेले आहे. परिणामी, जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ९६१ मुलांच्या तोंडचा घास हिरावला आहे.
जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पोषण आहार पुरविला जातो. हा पोषण आहार खिचडीच्या रूपाने दिला जातो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडीऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचविला जात होता; परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपलेला आहे. नवीन कराराच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोट्यवधी रुपयांचा हा धान्य पुरवठ्याचा ठेका जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांच्या वादात अडकला आहे.
मागील पुरवठादाराचा कालावधी नोव्हेंबर २०२० अखेरीस संपला. मागील टेंडर जिल्ह्यातील एका दिग्गज भाजप नेत्याच्या कार्यकर्त्याला मिळाले होते. मात्र, आता जिल्ह्यातील एका दिग्गज काँग्रेस नेत्याने हे टेंडर आपल्या कार्यकर्त्याला मिळावे यासाठी ताकद पणाला लावली. त्याचवेळी त्या भाजप नेत्यानेही हे टेंडर आपल्याच कार्यकर्त्याला मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली. टेंडरचा विषय दोघांकडूनही प्रतिष्ठेचा करण्यात आल्यामुळे गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत पोषण आहाराचे टेंडर होऊ शकले नाही. दोघांच्या वादात पोषण आहाराचे टेंडरच रखडले अन् चिमुकल्यांच्या तोंडातला घास हिरावला गेला.

Web Title: For politics, stopped distributing school nutrition to the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.