Poll: तुम्हाला काय वाटतं... विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आघाडीसोबत जातील?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:54 PM2019-04-22T17:54:07+5:302019-04-22T17:55:38+5:30
'राजनीती'मागे काहीतरी 'राज की बात' असल्याची शंकाही बऱ्याच दिवसांपासून व्यक्त होतोय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची एकही जागा लढवत नसली, तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत धुरळा उडवून दिला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाडा, असा प्रचार ते जाहीर सभा घेऊन करत आहेत. त्यांच्या या भूमिकेचं काही जण भरभरून कौतुक करताहेत, तर काही जण त्यांची टिंगल उडवताहेत. या 'राजनीती'मागे काहीतरी 'राज की बात' असल्याची शंकाही बऱ्याच दिवसांपासून व्यक्त होतोय. परंतु, राज कुठल्याच पक्षाचं किंवा उमेदवाराचं नाव घेत नसल्यानं तसं थेट म्हणता येत नाही. 'ए लाव रे तो व्हिडीओ', म्हणत त्यांनी घेतलेली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरू शकेल, असं मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या पुढच्या प्रवासाबद्दल एक भाकित वर्तवलं आहे.
सध्या लोकांची करमणूक करणारे आणि राजकीय अस्तित्व शोधणारे राज ठाकरे हे पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जातील आणि निवडणूक लढवतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी वर्तवलेला हा अंदाज तुम्हाला पटतो का?