Chitra Wagh : "आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार"

By बाळकृष्ण परब | Published: February 27, 2021 12:55 PM2021-02-27T12:55:19+5:302021-02-27T13:03:48+5:30

Chitra Wagh reacted after the ACB filed a case against her husband : चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pooja Chavan : Chitra Wagh Challenge to Maha Vikas Aghadi Government on Pooja Chavan Issue & reacted About the ACB filed a case against her husband | Chitra Wagh : "आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार"

Chitra Wagh : "आता मीच तुम्हाला पुरून उरणार, पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार आणि बोलत राहणार"

googlenewsNext

नाशिक - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (pooja Chavan Death case) आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांच्या पतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या नवऱ्याला गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रास दिला जातो. मलाही काही प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता नवी माणसं उभी करून माझ्यावरही काही गुन्हे दाखल होतील. मात्र मी याला घाबरत नाही. आता मीच तुम्हाला पुरून उरणार. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच चित्रा वाघ यांनी दिले.  ("Now I will bury you, talk about Pooja Chavan and keep talking." Chitra Wagh's challenge to Mahavikas Aghadi )

या प्रकरणात पतीवर दाखल झालेल्या गुन्ह्या प्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. किती तर म्हणे ९० टक्के बेहिशेबी मालमत्ता. मात्र याबाबतची माहिती मला अजून कळलेली नाही. जी कळली ती पत्रकारांकडून कळली. एफआयआरची कॉपीही व्हॉट्सअॅपवर मिळाली. प्रत्यक्ष कॉपी पाठवायला एसीबीकडील माणसं संपली का, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच या प्रकरणात माझ्या नवऱ्याने एक रुपयाही घेतलेला नाही. जेव्हा हा प्रकार घ़डला, तेव्हा माझा नवरा त्या घटनास्थळाचा पाच किमी परिसरातही नव्हता. असेही त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपीची अद्याप चौकशीही झालेली नाही, असा दावाही वाघ यांनी केला. 

याबाबत चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, आज मला शरद पवार साहेबांची आठवण येत आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्या पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पवार साहेबांकडे मी गेले होते. त्यांना मी तक्रारीची कॉपी दिली. तेव्हा पवार साहेब म्हणाले की, यात तुझा नवरा कुठेच दिसत नाही. त्यानंतर याबाबत न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती लढाई आम्ही लढतोय. 

 या प्रकरणात आम्ही सहकार्याला तयार आहोत. तरीही माझ्या पतीला मानसिक त्रास दिला जातोय. खरंतर यात मलाच अडकवायचं होतं. तशी चाचपणीही झाली होती. आता आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढू. तसेच यावेळी अजून एक सांगू इच्छिते की, तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहोचलाय. तुम्हाला काय वाटतं गुन्हा दाखल झाला म्हणून मी गप्प बसणार, मी गप्प बसणार नाही. आता तुम्हाला मीच पुरून उरणार. नाहीतर माझं नाव चित्रा वाघ म्हणून सांगणार नाही. पूजा चव्हाण प्रकरणावर बोलणार, रोज बोलणार आणि न्याय मिळेपर्यंत बोलत राहणार, असे प्रतिआव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला दिले. 

Web Title: Pooja Chavan : Chitra Wagh Challenge to Maha Vikas Aghadi Government on Pooja Chavan Issue & reacted About the ACB filed a case against her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.