Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 12:08 PM2021-02-28T12:08:56+5:302021-02-28T12:11:45+5:30

Pooja Chavan Death Case: विरोधी पक्षाकडून राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव; पोहरादेवीतल्या महंतांकडून राजीनामा न घेण्याची विनंती

Pooja Chavan Death Case dont take sanjay rathod resignation in hurry pohradevi mahant makes request to cm uddhav thackeray | Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

Pooja Chavan Death Case: संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?

googlenewsNext

वाशीम/मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) दबाव वाढला आहे. भारतीय जनता पक्षानं राठोड यांच्या राजीनाम्यासाठी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर आता राठोड यांनी राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी पक्षावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?

संजय राठोड यांचा राजीनामा तडकाफडकी घेतला जाऊ नये, अशी विनंती पोहरादेवीच्या महंतांकडून केली जात आहे. राठोड यांचा राजीनामा घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी, असं आवाहन महंतांकडून करण्यात आली आहे. 'पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आधी चौकशी होऊ द्या. दोषी आढळून येईपर्यंत त्यांचा राजीनामा घेऊ नका,' असं पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

राठोड यांचा राजीनामा घ्या, तरच होऊ देणार कामकाज; विरोधकांचा इशारा

'आमच्याकडून, बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री ठाकरेंवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही. उद्धव ठाकरे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो. आम्ही केवळ समाजाची भावना मांडत आहोत. मुख्यमंत्री, सरकारवर दबाव टाकण्याचा आमचा हेतू नाही,' असं जितेंद्र महाराज यांनी स्पष्ट केलं. संजय राठोड पुन्हा पोहरादेवीला येऊ शकतात असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. 'राठोड पुन्हा पोहरादेवीला येणार असल्याचं आम्हाला त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे. ते इथे आल्यास महंतांशी चर्चा करून पुढील वाटचालीबद्दल निर्णय घेतील,' असं महाराज म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी राज्य सरकारवर मोठी नामुष्की ओढवल्यानं शिवसेनेनं राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत कालच माध्यमांशी बोलताना राठोड यांच्या राजीनाम्याबद्दलचे संकेत दिले आहेत. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याप्रकरणी काही डोळे मिटून बसलेले नाही. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील,' असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.

भाजपचा आक्रमक पवित्रा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, नाहीतर अधिवेशन होऊ देणार नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूजा चव्हाण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागेल, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला. यासोबतच संपूर्ण राज्यभर भाजपकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनं करण्यात आली. 

Web Title: Pooja Chavan Death Case dont take sanjay rathod resignation in hurry pohradevi mahant makes request to cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.