Pooja Chavan Suicide Case: मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड विरोधकांवर संतापले
By प्रविण मरगळे | Published: February 28, 2021 06:06 PM2021-02-28T18:06:03+5:302021-02-28T18:09:36+5:30
Sanjay Rathod Reaction on his Resignation, Target on BJP: या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका असल्याचं राठोडांनी सांगितले
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेलं पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणावरून अखेर वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आहे, परंतु मी फक्त मंत्रिपद सोडलं आहे, आमदारकीचा राजीनामा दिला नाही असं स्पष्टीकरण संजय राठोडांनी दिलं आहे.(After the resignation of Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case), he criticized the BJP)
राजीनाम्याबाबत संजय राठोड म्हणाले की, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे, बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्यावरून विरोधकांनी माझ्याविरोधात घाणेरडे राजकारण केले, अनेक माध्यमातून माझी वैयक्तिक बदनामी या प्रकरणाच्या माध्यमातून करण्यात आली, मागील ३० वर्ष मी राजकीय आणि सामाजिक जीवनात असून मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका असल्याचं राठोडांनी सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश
तसेच मी मुख्यमंत्र्याकडे राजीनामा देताना माझ्यासोबत अनिल परब आणि अनिल देसाई उपस्थित होते, चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवं असं मला वाटलं, माझा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली, ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेविरोधात आहे, माझ्या समाजावर आरोपांमुळे जो परिणाम झालाय, त्यासाठी मी बाजूला होत आहे, यातील खरं सत्य चौकशीतून बाहेर यावं असं मला वाटतं असं मत संजय राठोड यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचा विदर्भातील वाघ 'घरी' गेला, उद्धव ठाकरेंनी 'मेसेज' दिला, पण...
"अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”
गेले पंधरा दिवस मुख्यमंत्री कुठे होते? त्यांनी एवढ्या उशीरा संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, हा राजीनामा भाजपामुळेच घेतला आहे कारण भाजपाने रस्त्यावरची लढाई लढली आणि त्यामुळे कुंभकर्ण जागा झाला आहे अशा शब्दांत भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खरमरीत टिका केली. तीन पक्षाच्या सरकारमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेवर(Shivsena) दबाव होता. वादाचा विस्फोट ही झाला असता त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्याचा घेतलेला राजीनामा नक्कीच राज्यपालांकडे पाठवतील अन्यथा आम्ही अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला सोडणार नाही असा इशारा भाजपा आमदार राम कदम यांनी दिला आहे.
"अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका