“वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्रा वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या”
By प्रविण मरगळे | Published: February 25, 2021 04:28 PM2021-02-25T16:28:07+5:302021-02-25T16:31:52+5:30
Pooja Chavan Suicide Case, BJP Ashish Shelar Criticized CM Uddhav Thackeray over NO Action on Sanjay Rathod: तमाम महाराष्ट्रातील माता-भगिनींसाठी तुमचे मौन सोडा! वनमंत्र्याच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या असं त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात ठाकरे सरकारला विरोधी पक्ष भाजपाने (BJP) कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे, भाजपाच्या चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) यांनी संजय राठोड यांना थेट हत्यारा असं संबोधलं असून या प्रकरणात संजय राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने लावून धरली आहे. (BJP Ashish Shelar Target CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod & Pooja Chavan Suicide Case)
यातच भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, आम्ही वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताई वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या, मुख्यमंत्री महोदय आमच्यासाठी नको पण, तमाम महाराष्ट्रातील माता-भगिनींसाठी तुमचे मौन सोडा! वनमंत्र्याच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या असं त्यांनी सांगितलं आहे.
संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?
आम्ही "वाघ" आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्राताई वाघ यांच्या सारखी "वाघा"ला साजेशी भूमिका घ्या!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 25, 2021
मा.मुख्यमंत्री महोदय,आमच्यासाठी नको पण
तमाम महाराष्ट्रातील माता,भगिनींसाठी तुमचे मौन सोडा!
वनमंत्र्यांच्या प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या!
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
पुण्यात पूजा चव्हाणने आत्महत्या केलेल्या घटनस्थळाची चित्रा वाघ यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रुम सील करण्यात आली असल्याची माहिती दिली. यानंतर वाघ यांनी वानवडी पोलिसांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर व संजय राठोड यांच्यावर खरमरीत शब्दात जोरदार हल्लाबोल केला. वाघ म्हणाल्या की, वानवडी पोलीस निरीक्षक ज्या भाषेत बोलले असे वरिष्ठ अधिकारी पण बोलले नाही. साधा प्रश्न १७ दिवस एफआयआर का नाही? ते म्हणाले ,'लेखी आदेश नाही. पोलीस लेखी आदेशाची वाट बघत आहेत. सुमोटो अंतर्गत का नाही गुन्हा दाखल केला? तसेच पोलिसांना चालवणारा बाप कोण आहे? आणि हत्यारा संजय राठोडला वाचवण्यासाठी तुम्ही सगळं पणाला लावणार का? असा सवाल उपस्थित देखील वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.
“मी मर्द आहे’ हे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परत कधीही भाषणात म्हणू नये”
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची परीक्षा
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) निर्णय क्षमतेची परीक्षा आहे, मुख्यमंत्री म्हणून आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना अभय द्यायचा की, या महाराष्ट्रात पक्षाबद्दल, लोकशाहीविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
मी गायब नव्हतो, बदनामी थांबवा
मी गायब नव्हतो, तर आई-वडील म्हातारे असल्यामुळे त्यांना व पत्नीला धीर देण्यासाठी बंगल्यावर होतो. आता पोहरादेवीचे दर्शन करून पूर्ववत कामाला लागणार आहे. मागासवर्गीयांचा नेता असल्यामुळे माझ्यावर घाणेरडे आरोप करून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे राजकारण केले जात आहे. माझी व समाजाची बदनामी थांबवा असं आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले