Pooja Chavan Suicide Case: भाजपा आमदाराला धमक्यांचे फोन; ठाकरे सरकारवर लावले गंभीर आरोप
By प्रविण मरगळे | Published: February 15, 2021 12:45 PM2021-02-15T12:45:44+5:302021-02-15T12:48:27+5:30
BJP MLA Atul Bhatkhalkar receives threatening phone call in Pooja Chavan suicide case: काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांबाबत समोर येत असतील तर महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत का? असा प्रश्न अतुल भातखळकरांनी उपस्थित केला होता.
मुंबई – परळीतील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली, रविवारी मध्यरात्री या तरूणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती, मात्र या तरूणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीने केला होता, त्यानंतर चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांचं नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. (Threaten call to BJP MLA Atul Bhatkhalkar in Pooja Chavan Suicide Case, allegation on Thackrey Government)
भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनीही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत(Pooja Chavan Suicide Case) आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येतायेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला.
पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2021
धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे. @Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@OfficeofUT
तसेच धमक्यांनी बंधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, या पत्रात म्हटलं होतं की, शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे या प्रकरणी नाव पुढे आले आहे, या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमत्र्यांना केली होती.
महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत का?
काही दिवसांपूर्वी एका मंत्र्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करण्यात आली होती, हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका मंत्र्याचे नाव थेट युवतीच्या आत्महत्येशी जोडले जात आहे. इतक्या गंभीर प्रकरणांमध्ये आपल्याच मंत्री मंडळातील सहकाऱ्यांची नावे पुढे येत असताना आपण डोळ्यावर काळी पट्टी बांधून बसला आहात अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांची नावेच जर अशाप्रकारे महिला अत्याचारांबाबत समोर येत असतील तर महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत का? असा प्रश्न अतुल भातखळकरांनी उपस्थित केला होता.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.