Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”
By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 08:32 AM2021-02-18T08:32:56+5:302021-02-18T08:36:43+5:30
Pooja Chavan Suicide Case, BJP Target Thackeray Government over Sanjay Rathod Missing: महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब.
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडलं आहे. धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप ताजे असतानाच संजय राठोड(Sanjay Rathod) प्रकरणामुळे विरोधकांना महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळाली आहे. (BJP Keshav Upadhye Criticized CM Uddhav Thackeray & Anil Deshmukh over Pooja Chavan Suicide Case, Minister Sanjay Rathod missing from last 10 Days)
या प्रकरणात भाजपाचे मुख्य प्रवक्ते(BJP Keshav Upadhye) यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. उपाध्ये म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होत पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब असतात कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा, महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) यांना लगावला आहे.
महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पहातोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या @OfficeofUT@AnilDeshmukhNCP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 18, 2021
यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?
पूजा चव्हाण आत्महत्येच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी मेडिकलच्या प्रसूती वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेली ती युवती नेमकी कोण, याचा उलगडा झालेला नाही. दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी दोनपर्यंत तिच्यावर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही केले. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली, हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट-२ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणारे डॉक्टर कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासांतच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोडे आहे.
“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”; सरपंचाचा गंभीर आरोप, भाजपाचा राजीनामा