Pooja Chavan : पूजा चव्हाण आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांनी आधी बोलणे टाळले; 'चौकशी होईल', म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:49 PM2021-02-13T18:49:46+5:302021-02-13T19:10:51+5:30
Pooja Chavan Suicide case, CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod : ट्रान्सहार्बर कामाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली.
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide case) प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना शिक्षा केली जाईल. परंतू गेल्या काही दिवसांत एखाद्याला आयुष्यातून उठविण्याचे प्रयत्न पाहिले आहेत. यामुळे कोणी दोषी वाचता नये तसेच कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. यामुळे जे सत्य असेल ते जनतेसमोर येईल, असे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांनी म्हटले आहे. (CM Uddhav Thackreay talk on Sanjay Rathod and pooja chavan suicide Case)
ट्रान्सहार्बर कामाची आज ठाकरेंनी पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सहार्बर कामाची माहिती दिली. नंतर पत्रकारांनी पूजा चव्हाणचा विषय काढताच, काही काळासाठी त्यांनी हा प्रश्न टाळला. एक्स्प्रेस वेवर प्रश्न सुरु असताना आधी ते बोलतो असे ते म्हणाले. यानंतर पत्रकारांनी पूजाबाबतचा प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी सखोल चौकशी होईल, असे सांगितले.
पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा तिच्यासोबत दोघेजण उपस्थित होते. तिला अत्यवस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेल्यावर शेजाऱ्यांनी फैलावर घेतल्यावर या दोघांपैकी एका तरुणाने कथित मंत्र्यासोबतच्या संभाषणाच्या क्लीप या स्थानिकांना दिल्याचे समोर आले आहे.
पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे असे हे संबंधित मंत्री अरुण राठोडला सांगत होते. यवतमाळमध्ये 2 ऑक्टोबरला अॅडमिट असलेली व्यक्ती ही पूजाच होती असे या अरुण याने दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने एका टीव्ही चॅनेलला सांगितले. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा तिच्यासोबत असलेले तरुण हे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनच तिथे आले होते. त्या दोघांना पूजाने आत्महत्या केल्यानंतर शेजाऱ्यांनी पकडून ठेवले होते, असे समजते. अरुण राठोडला या मंत्र्यानेच नोकरीला लावले होते. पूजाचा लॅपटॉप अद्याप सापडलेला नाही, असे समजते.
राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची दखल घेण्याची विनंतही करण्यात आली होती. या विनंतीनुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी हे आदेश दिले आहेत. रेखा शर्मा य़ांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यामध्ये लवकरात लवकर पोलिसांनी तपास अहवाल आयोगाला सादर करावा. यामध्ये याप्रकरणी काय कारवाई केली हे देखील असावे, असे म्हटले आहे.