Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 02:09 PM2021-02-14T14:09:48+5:302021-02-14T14:15:52+5:30

Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी

Pooja Chavan Suicide Case devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray statement | Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

googlenewsNext

नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याआधी फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत. त्यामुळे राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. (Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case)

आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्री

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्यानं कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आहेत. त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवं. सत्य लोकांसमोर यायला हवं. पण पोलिसांवर दबाव असल्यानं त्यांच्याकडून सत्य लपवलं जातं आहे, असं फडणवीस म्हणाले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

आत्महत्येआधी पूजा चव्हाणनं पोस्ट केले होते हे फोटो; बोलक्या फोटोंमधून नक्की काय सांगायचं होतं?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राठोड यांच्यावर झालेले आरोप पाहता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी मैदान खुलं आहे. पोलिसांवरील दबाव दूर व्हायला हवा आणि सत्य समोर यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पूजा राठोड प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही, असं ठाकरे म्हणाले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भानं मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं मानलं जातं.

मुख्यमंत्र्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं फडणवीस म्हणाले.

Web Title: Pooja Chavan Suicide Case devendra fadnavis reaction on cm uddhav thackeray statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.