Pooja Chavan Suicide Case: व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपमधला आवाज अरूण राठोडचा नाही?

By प्रविण मरगळे | Published: February 15, 2021 12:04 PM2021-02-15T12:04:21+5:302021-02-15T12:06:09+5:30

Pooja Chavan Suicide Case, BJP Allegations on Shiv Sena Minister Sanjay Rathod: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत,यात प्रामुख्याने अरूण राठोड या तरूणाचं नाव येत आहे, मात्र हा आवाज अरूण राठोडचा नाही असं त्याच्या गावातील लोक म्हणतं आहेत.

Pooja Chavan Suicide Case: Isn't Arun Rathore the voice in the viral clip? Sanjay Rathod in trouble | Pooja Chavan Suicide Case: व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपमधला आवाज अरूण राठोडचा नाही?

Pooja Chavan Suicide Case: व्हायरल झालेल्या ‘त्या’ क्लिपमधला आवाज अरूण राठोडचा नाही?

googlenewsNext
ठळक मुद्देवडिलांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो २ दिवस बाहेर गेला आहे, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे त्यांचे कुटुंब आहेअरूण राठोडचा आवाज नाही, त्यामुळे त्यावर शंका आहे. ही दुर्देवी घटना आहेकाहीही पुरावा नसताना फक्त ऑडिओ क्लिपवरून बदनामी करणं योग्य नाही

बीड – पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे,  यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे. (In Pooja Chavan Suicide Case Villagers make doubt on Audio clip voice of Arun Rathod)  

मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडचा(Arun Rathod) आवाज नाही असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थ म्हणतात की, पूजा चव्हाण आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, त्यात अरूण राठोडचं नाव येतं परंतु या क्लिपमधील आवाज अरूण राठोडचा नाही, वडिलांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो २ दिवस बाहेर गेला आहे, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे त्यांचे कुटुंब आहे, अरूण हा सुशिक्षित मुलगा आहे, त्याला पुण्याला जाऊन जास्त दिवस झाले नाहीत. पूजा चव्हाण आणि अरूण राठोड हे वर्गमित्र असल्याने त्यांची ओळख होती असं त्यांनी सांगितले

तसेच अरूण राठोडचा आवाज नाही, त्यामुळे त्यावर शंका आहे. ही दुर्देवी घटना आहे त्यात चांगल्या नेत्यांना ओढणं योग्य नाही. संजय राठोड यांची नाहक बदनामी झाली आहे. काहीही पुरावा नसताना फक्त ऑडिओ क्लिपवरून बदनामी करणं योग्य नाही, पोलीस चौकशीतून सत्य बाहेर येईल, विनाकारण बंजारा समाजाची बदनामी होऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पूजाच्या वडिलांनीही केला होता दावा

पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले आहेत.

कोण आहे अरूण राठोड?

अरूण सुभाष राठोड हा वनविभागात नोकरी आहे, तो बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे कुटुंबासह राहत होता, काही दिवसांपूर्वीच अरूण पूजासोबत पुण्यात राहायला गेला होता. ऑडिओ क्लिपमध्ये अरूण राठोडला कथित मंत्र्यांने सूचना दिली होती असं सांगितलं जातं, परंतु हा आवाज संजय राठोड यांचा होता का याबाबत पुष्टी नाहीत, पोलिसांनी या प्रकरणात अरूणची चौकशी सुरू केली आहे, ज्यावेळी पूजा चव्हाणने आत्महत्या केली तेव्हा अरूण राठोड तिथेच उपस्थित होता, आम्हाला फक्त आवाज ऐकायला आला असं अरूणने पोलिसांना सांगितले.

पाहा व्हिडीओ -

Web Title: Pooja Chavan Suicide Case: Isn't Arun Rathore the voice in the viral clip? Sanjay Rathod in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.