Pooja Chavan Suicide Case : "केवळ राजीनामा पुरेसा नाही, संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करा"
By बाळकृष्ण परब | Published: February 16, 2021 12:17 PM2021-02-16T12:17:51+5:302021-02-16T12:22:59+5:30
Pooja Chavan Suicide Case, BJP Demands Sanjay Rathod arrest : पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. (Pooja Chavan Suicide Case) पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (BJP leader Atul Bhatkhalkar Demands Sanjay Rathod arrest )
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यापासून भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राठोड आणि शिवसेनेला खिंडीत गाठले होते. दरम्यान, विरोधक तसेच इतर माध्यमातून वाढत असलेल्या दबावामुळे आज संजय राठोड यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा. तसेच केवळ संजय राठोड यांचा राजीनामा पुरेसा नाही. तर संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी.
वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरू होत्या. दरम्यान, या प्रकरणाच्या निष्पक्षपाती चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.