Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री निर्णय घेतील”; संजय राठोड राजीनाम्यावर शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले...

By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 10:59 AM2021-02-16T10:59:36+5:302021-02-16T11:03:46+5:30

Shiv sena Sanjay Raut Comment on Sanjay Rathod resignation in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत

Pooja Chavan Suicide Case: Sanjay Raut Statement on Shiv Sena Sanjay Rathod resignation | Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री निर्णय घेतील”; संजय राठोड राजीनाम्यावर शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले...

Pooja Chavan Suicide Case: “मुख्यमंत्री निर्णय घेतील”; संजय राठोड राजीनाम्यावर शिवसेना खा. संजय राऊत म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक आहे, त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणीसोडून बाकी इतर विषय नाहीतसंजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतीलमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या विषयावर बोलत आहेत, त्यामुळे सरकार भूमिका घेत नाहीत, असं कसं म्हणू शकतो

मुंबई – पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये राजीनामा दिलेले संजय राठोड हे पहिले मंत्री आहेत. आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी यासाठी हा राजीनामा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.(Sanjay Raut Reaction on Minister Sanjay Rathod resignation in Pooja Chavan Suicide Case)     

या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

तसेच शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक आहे, त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणीसोडून बाकी इतर विषय नाहीत, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या विषयावर बोलत आहेत, त्यामुळे सरकार भूमिका घेत नाहीत, असं कसं म्हणू शकतो असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

केंद्र सरकारची विरोधकांवर नजर

भाजपा आयटी सेलबाबत काहीतरी करावं लागेल. ते देश चालवू शकत नाहीत, केंद्र सरकारकडून आमच्यावरही पाळत ठेवत आहे, केंद्राकडे या संस्था आहेत, त्यामुळे विरोधकांवर पाळत सरकार ठेवत आहेत असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला?

पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असा एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत होता. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्येशी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा राजीनामा घेतला आहे, त्याचसोबत उद्धव ठाकरेंच्या या कृतीतून राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यावर आरोप झाले होते, मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन तरूणाला मारहाण करणे असा आरोप जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्यावर लागला होता, तर धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर दोन पत्नी, मुलं हे सगळं प्रकरण समोर आलं, या दोन्ही प्रकरणात शरद पवारांनी(NCP Sharad Pawar) राष्ट्रवादी मंत्र्यांची पाठराखण केली होती.

Web Title: Pooja Chavan Suicide Case: Sanjay Raut Statement on Shiv Sena Sanjay Rathod resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.