Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचं भाजपासोबत कनेक्शन काय? वडील लहू चव्हाण म्हणाले...
By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 12:03 PM2021-02-18T12:03:02+5:302021-02-18T12:08:47+5:30
Pooja Chavan Suicide Case, BJP: नुसती बदनामी सुरू आहे, कोणीही माझी फोन करून विचारपूस करत नाही. सर्वांनी सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे असं तिचे वडील म्हणाले.
मुंबई – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणावरून सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येसाठी शिवसेना मंत्री संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) जबाबदार असल्याचं आरोप भाजपाने(BJP) केला आहे, सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याने शिवसेनेने(Shivsena) वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.(Pooja Chavan was BJP Worker)
पूजा चव्हाण आणि भाजपाचं कनेक्शन काय होतं? याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पूजा ३ वर्ष भाजपाची कार्यकर्ता होती, तिथं कोणी काही विचारत नव्हतं, काय झालं नेमकं मला माहिती नाही असं म्हटलं आहे. दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) निवेदन देण्यात आलं आहे.
या निवेदनात पूजाचे वडील लहू चव्हाण(Lahu Chavan) म्हणतात की, पूजा ही कर्जबाजारी होती, त्यामुळे तिची मन:स्थिती चांगली नव्हती, ती चक्कर येऊन खाली पडली, त्याचा संजय राठोड यांच्यांशी संबंध नाही. विरोध पक्ष नाहक संजय राठोड यांची बदनामी करत आहे. त्यामुळे संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारू नये असं म्हटलं आहे. तसेच हे सगळं थांबवलं पाहिजे, पूजा चव्हाणसोबत अरूण राठोडचं नाव जोडणं चुकीचं आहे. त्याचा काहीही संबंध नाही. नुसती बदनामी सुरू आहे, कोणीही माझी फोन करून विचारपूस करत नाही. सर्वांनी सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे असं तिचे वडील म्हणाले.
महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”
पूजा चव्हाण भाजपात होती
पूजा चव्हाण हिचं फेसबुक अकाऊंट सर्च केलं असता ती भाजपाच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं, तसेच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे पूजा ही भाजपाची कार्यकर्ता होती हे दिसून येते.
स्टेट बँक ऑफ इंडियाचं पूजावर कर्ज
पूजा चव्हाणने बीडच्या गांधी मार्केट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पोल्ट्री व्यवसायासाठी साडे तेरा लाखांचे कर्ज घेतलं होतं. बँकेने २०१८ मध्ये पूजाला कर्ज मंजूर केलं होतं. तिला दोन लाखांची सबसीडीही देण्यात आली होती. कर्ज घेण्यासाठी तिने परळीतील घर आणि वसंत नगर तांड्यातील एक एकर शेती तारण म्हणून ठेवली होती. तिला दरमहा ३५ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. तिने कर्जाचे १२ हप्तेही भरले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तिला कर्जाचे हप्ते भरता आले नव्हते. पूजाला कर्जाचे हप्ते भरता आले नसले तरी बँकेकडून हप्त्यांसाठी तिला कोणताही तगादा लावण्यात आलेला नव्हता. तिला नोटीसही पाठवण्यात आली नव्हती, असं एसबीआय(SBI)ने स्पष्ट केलं आहे.