विधानसभेत पटनायकच जिंकण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:22 AM2019-04-18T04:22:04+5:302019-04-18T04:22:39+5:30

मोदींच्या नेतृत्वाखाली २0१४ साली देशाच्या अनेक भागांत चांगला विजय मिळवल्यानंतर भाजप यंदा ओडिशात जम बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

The possibility of winning Patnaik in the Legislative Assembly | विधानसभेत पटनायकच जिंकण्याची शक्यता

विधानसभेत पटनायकच जिंकण्याची शक्यता

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : मोदींच्या नेतृत्वाखाली २0१४ साली देशाच्या अनेक भागांत चांगला विजय मिळवल्यानंतर भाजप यंदा ओडिशात जम बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. चारवेळा सहज बाजी मारणारे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. लोकसभेच्या २१ आणि विधानसभेच्या १४७ जागांसाठी पहिल्या चार टप्प्यांत निवडणुका होत असून, पहिल्यांदाच बीजेडी-भाजप यांच्यात १९ जागी लढत आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मात्र वेगळी स्थिती दिसते. बिजदचे खा. तथागत सत्पथी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, लोकसभेसाठी भाजपचा फायदा होऊ शकेल. पण विधानसभा निवडणुकांत नवीन पटनायकच यांचाच विजय होईल. ओडिशातील जनता यावेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी वेगवेगळा कौल देऊ शकेल.
सत्पथी हे वैयक्तिक कारणांनी यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत; परंतु ते पक्षातच आहेत. लोकसभेचे वारे भाजपच्या दिशेने वाहत असल्याचे त्यांना वाटत आहे.
व्ही.पी. सिंह आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री श्रीकांत जेना यांचेही असेच मत आहे. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असला तरी ते कोणत्याही पक्षात सामील झालेले नाहीत. त्यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटी व महत्त्वाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर नवीन पटनायक यांनी संसदेत मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नवीन पटनायक यांच्याऐवजी मोदी यांनाच का मते देऊ नयेत, असे लोकांचे म्हणणे आहे.
भाजपला २०१४ मध्ये सुंदरगढचीच जागा जिंकता आली. नऊ ठिकाणी भाजप दुसऱ्या व अन्य ठिकाणी तिसºया क्रमांकावर होता. विधानसभेतही नऊच जागा मिळाल्या होत्या. यावेळी ओडिशात अधिक जागा मिळविण्याचा भाजपचा मनुसबा आहे.ओडिशात भाजप सदस्यांची संख्या ३ लाखांवरून ३६ लाखांवर गेली आहे.
२०१७ मध्ये पंचायत निवडणुकीतही भाजपची स्थिती सुधारली होती, असे भाजपचे ओडिशाचे प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले. भाजपने ओडिशात राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक घेतली होती.
>शेवटची निवडणूक?
भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, केओंझार, मयूरभंज, संभलपूर, बारगढ, धेनुकनाल, कंधामाल, फुलबनी, कालाहंडी बोलांगिर व अन्य तीन ठिकाणी भाजप चुरशीची लढत देत आहे. तथापि, पटनायक यांची शेवटची निवडणूक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पटनायक यांना कडवी लढत देण्याची भाजपची इच्छा नाही.

Web Title: The possibility of winning Patnaik in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.