प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:18 PM2024-10-09T13:18:00+5:302024-10-09T13:23:01+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. दहा उमेदवारांच्या नावांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Vanchit Bahujan Aghadi Candidate List: महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपांचा तिढा सुरू असतानाच इकडे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या आघाडीत सामील होणार का? अशीच चर्चा होत असतानाच वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी दहा उमेदवार जाहीर केले आहेत. यात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील मतदारसंघांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकरांनी दहा उमेदवार केले जाहीर
वंचित बहुजन आघाडीने दहा जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, मान, सांगली या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.
मलकापूर विधानसभा मतदारसंघ - शहजाद खान सलीम खान (मुस्लीम)
बाळापूर विधानसभा मतदारसंघ - खातीब सयद नातीक्वाद्दीन (मुस्लीम)
परभणी विधानसभा मतदारसंघ - सयद सामी सय साहेबजान (मुस्लीम)
औरंगाबाद मध्य मतदारसंघ - मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक (मुस्लीम)
गंगापूर विधानसभा मतदारसंघ - सय्यद गुलाम नबी सय्यद (मुस्लीम)
कल्याण पश्चिम मतदारसंघ - अयाज गुलजार मोलवी (मुस्लीम)
हडपसर विधानसभा मतदारसंघ - मोहम्म अफरोज मुल्ला (मुस्लीम)
मान विधानसभा मतदारसंघ - इम्तियाज जफर नदाफ (मुस्लीम)
शिरोळ विधानसभा मतदारसंघ - आरिफ मोहम्मदाली पटेल (मुस्लीम)
सांगली विधानसभा मतदारसंघ - अल्लाउद्दीन हयातचंद काझी (मुस्लीम)
वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा नारा
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीवेळी झाला होता. मात्र, सन्मानजनक जागा दिल्या जात नसल्याने वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवली होती. लोकसभेत चांगली कामगिरी वंचितला करता आली नाही.
आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचितने २१ उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत वंचितने ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.