VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:11 PM2024-10-16T22:11:21+5:302024-10-16T22:14:25+5:30

VBA Candidate List 2024 Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ३० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. 

Prakash Ambedkar's Vanchit Bahujan Aghadi announces list of 30 candidates for Maharashtra Assembly elections, Ambedkar also announces candidates against Aditya Thackeray | VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?

VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?

VBA Party Maharashtra Candidates list: लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत आघाडी घेतली आहे.  वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील उमेदवारांचीही घोषणा केली आहे. (Vanchit Bahujan Aghadi Candidate List)

आदित्य ठाकरेंसह माजी मंत्र्यांविरोधात उतरवले उमेदवार

प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांविरोधात उतरवले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अमोल निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अणुशक्ती मतदारसंघातून सतीश राजगुरू यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघातून विनोद खटके यांना उमेदवारी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात अब्दुल व्होरा, राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघात कावेरी खटके यांना उमेदवारी दिली आहे. 

विधानसभा निवडणूक २०२४ : वंचित बहुजन आघाडी उमेदवारांची नावे

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ - जितेंद्र शिरसाट

सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ - भोजासिंग तोडरसिंग रावल

उमरेड विधानसभा मतदारसंघ - सपना राजेंद्र मेश्राम

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ - सतीश मुरलीधर मालेकर

चिमूर विधानसभा मतदारसंघ - अरविंद आत्माराम सांदेकर 

किनवट विधानसभा मतदारसंघ - प्रा. विजय खुपसे

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - प्रा.डॉ. गौतम दुथडे

देगलूर विधानसभा मतदारसंघ - सुशील कुमार देगलूरकर

पाथरी विधानसभा मतदारसंघ - विठ्ठल तळेकर

परतूर-आष्टी विधानसभा मतदारसंघ - रामप्रसाद थोरात

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ -कावेरी बळीराम खटके

जालना विधानसभा मतदारसंघ - डेव्हीड घुमारे

बदनापूर विधानसभा मतदारसंघ - सतीश खरात

देवळाली विधानसभा मतदारसंघ - अविनाश शिंदे 

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ - भाऊराव काशिनाथ डगळे

वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांचा समावेश?
वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांचा समावेश?

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ - डॉ. संजय गुप्ता

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ - सतीश राजगुरू

वरळी विधानसभा मतदारसंघ - अमोल आनंद निकाळजे

पेण विधानसभा मतदारसंघ - देवेंद्र कोळी 

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ - दीपक पंचमुख

संगमनेर विधानसभा मतदारसंघ - अझीज अब्दुल व्होरा

राहुरी विधानसभा मतदारसंघ - अनिल जाधव

माजलगाव विधानसभा मतदारसंघ - शेख मंजूर चांद

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ - विनोद खटके

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ - डॉ. स्नेहा सोनकाटे

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ - प्रणित डिकले

परंडा विधानसभा मतदारसंघ - प्रवीण रणबागुल

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ - संतोषकुमार इंगळे

माळशिरस विधानसभा मतदारसंघ - राज कुमार

मिरज विधानसभा मतदारसंघ - विज्ञान माने

वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केलेल्या असून, पहिल्या यादीत १० तर दुसऱ्या यादीत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

Web Title: Prakash Ambedkar's Vanchit Bahujan Aghadi announces list of 30 candidates for Maharashtra Assembly elections, Ambedkar also announces candidates against Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.