"अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 10:08 AM2020-12-16T10:08:26+5:302020-12-16T10:11:02+5:30
Prashant Bhushan Slams BJP And Narendra Modi Over Farmers Protest : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि केंद्र सरकारवर कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सर्व स्तरावरून निशाणा साधला जात आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपा देशातील खरी तुकडे-तुकडे गँग असून शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे. याच दरम्यान ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
"अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत" अशा शब्दांत वकील प्रशांत भूषण यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत. आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अब तो मानना पड़ेगा कि मोदी जी चौकीदार हैं। सवाल सिर्फ इतना है की चौकीदारी किसके लिए करते हैं: अदानी अंबानी के लिए, या किसानों के लिऐ https://t.co/pu2WtRq6py
— Prashant Bhushan (@pbhushan1) December 15, 2020
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत आतापर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भाजपाने राष्ट्रीय एकताचे तुकडे केले आहेत, निर्लज्जपणे मुस्लिमांविरूद्ध हिंदूंना भडकावले आहे.आता ते आपल्या शीख बांधवांच्या विरोधात असे करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजपा जातीय आगीत ढकलत आहे, असा शब्दात सुखबीर सिंग बादल यांनी भाजपावर निशाणा साधला.
Farmers Protest : "सरकारला जे करायचं आहे ते त्यांनी करावं, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन भाजपाचा खोटारडेपणा उघड करतील"https://t.co/o0wsA7XJq1#FarmersProtest#FarmBills2020#FarmLaws#SamajwadiParty#AkhileshYadavpic.twitter.com/5nuUR5lICm
— Lokmat (@MiLOKMAT) December 13, 2020
शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली?
अलीकडेच सुखबीर सिंग बादल यांनी आंदोलनात खलिस्तानी असल्याच्या अफवांवरून आक्रमकता दाखविली होती. या आंदोलनात बर्याच वयस्कर महिलाही सहभागी झाल्या आहे. त्या खलिस्तानी दिसतात का? देशातील शेतकऱ्यांना असे संबोधित करण्याची काही पद्धत आहे का? हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले होते. तसेच, ते म्हणाले होते की, "त्यांची आमच्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिम्मत कशी झाली? शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा हक्क भाजपाला किंवा इतर कोणाला कुणी दिला? शेतक्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले आहे आणि आपण त्यांना देशद्रोही म्हणत आहात? जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत, ते स्वत: गद्दार आहेत."
Farmers Protest : "17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही"https://t.co/VmsaF5Vx8V#Congress#FarmerProtest#FarmBills2020#RahulGandhi#ModiGovernmentpic.twitter.com/OsPZWkqCNE
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020