"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:36 PM2021-07-21T16:36:10+5:302021-07-21T16:36:53+5:30

Pravin Darekar : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Pravin Darekar’s latter to CM Uddhav Thackeray, said help families of teachers in non-granted schools  | "एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा"

"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा"

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विनाअनुदानित शाळांमधीलशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फक्त शिक्षकच नाही तर त्यांचे कुटुंबीयही या संकटातून जात आहेत. कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत, विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Pravin Darekar’s latter to CM Uddhav Thackeray, said help families of teachers in non granted schools)

प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातील पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पत्रात कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, असे म्हटले आहे. हे पत्र प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी आणखी काही मुद्दे पत्रात मांडले आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको'
याचबरोबर, प्रवीण दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले आहे. तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. तर अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची भेट!
प्रवीण दरेकर हे 17 जुलै रोजी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर ते म्हणाले, "कोरोनामुळे शाळा बंद असल्याने उपजिविका भागवण्यासाठी औरंगाबाद येथील एका शिक्षकाने शिक्षकी पेशा बाजूला ठेऊन दुकानांवर जाऊन चिकटटेप विकणे स्वीकारले. तसेच पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील शिक्षकाने गावाकडे जाऊन शेती केली, या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या."

याचबरोबर, राज्य सरकार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या अवस्थेकडे गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे या प्रश्नावर आवाज उठविणार आहे. अशा शाळांमधील शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे करणार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Pravin Darekar’s latter to CM Uddhav Thackeray, said help families of teachers in non-granted schools 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.