अब्दुल्लांना हवा जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान, मोदी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 10:36 PM2019-04-01T22:36:26+5:302019-04-01T22:36:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि महागठबंधनवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि महागठबंधनवर हल्लाबोल केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची केलेली मागणीवरूनच आता मोदींनी विरोधकांना कात्रीत पकडलं आहे. मोदी एका रॅलीला संबोधित करताना म्हणाले की, जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान व्हावा, यांसारखी स्थिती निर्माण केली जातेय. अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या नेत्यांना काँग्रेस आणि महागठबंधनवाले समर्थन देणार आहेत काय, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला आहे.
भाजपाच्या काही नेत्यांनी जम्मू-काश्मीरमधला 370 कलम संपवण्याच्या केलेल्या मागणीवर ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती. तसेच जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी वेगळा पंतप्रधान त्या राज्याला मिळायलाच हवा, याचाही उल्लेख ओमर अब्दुल्लांनी केला.
PM Modi in Telangana says "Congress ke ek bade sahyogi dal, National Conference ne bayan diya hai ki Kashmir mein alag PM hona chahiye. Congress ko jawab dena hoga. Kya karan hai ki unka saathi dal is prakar ki baat bolne ki himmat kar raha hai." pic.twitter.com/S8BYKpaqrY
— ANI (@ANI) April 1, 2019
मोदींनी या प्रचार सभेत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंवरही निशाणा साधला आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना प्रसिद्ध चित्रपट असलेल्या बाहुबलीतल्या भल्लालदेवशी केली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थिती सत्ता स्वतःच्याच घरात ठेवायची आहे, अशी टीकाही मोदींनी केली आहे. चंद्राबाबू नायडू हे बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवसारखंच आहेत. तसेच त्यांनी अनेक लोकांची माहिती चोरल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.