56 इंच छातीवाले रोजगार का देत नाहीत?, प्रियंका गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:56 AM2019-03-19T11:56:56+5:302019-03-19T12:24:14+5:30
लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे.
प्रयागराजः लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनीही काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रयागराजमध्ये प्रियंका गांधींनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ मोठमोठ्या बाता मारतात, पण विकास काहीच दिसत नाही. जे 56 इंच छातीवाले आहेत, ते रोजगार का उपलब्ध करून देत नाही, असा सवालही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. सीतामढीमध्ये प्रियंका गांधींनी मोदींवरही निशाणा साधला आहे. तुम्ही शक्तिमान आहात, तुमची 56 इंचाची छाती आहे. मग रोजगार उपलब्ध करून का नाही दिलात, कारण हीच तुमची दुर्बलता आहे. हे कमकुवत सरकार आहे. पाच वर्षांत केंद्र सरकारनं काहीही केलेलं नाही.
70 वर्षांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी मोदी सरकारला घेरलं. 70 वर्षांच्या रडगाण्यालाही एक्सपायरी डेट असते, हे विसरू नका, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. तर काल प्रियंका गांधींनी मोदींवर निशाणा साधला होता. चौकीदार हे गरीब शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, असं सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.
Congress General Secretary UP-East Priyanka Gandhi Vadra in Bhadohi: 'What did they do in 70 years?' argument also has an expiry date. Now they (BJP) should tell what they have done in their five years when they are in power. pic.twitter.com/VEYgPsDh4Q
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं होतं. तसेच त्यांनी यावेळी सपा-बसपावरही निशाणा साधला आहे. काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. आम्हाला कोणावाचूनही काही समस्या नाही. आमचा उद्देश भाजपाला हरवण्याचा आहे. तोच उद्देश त्या लोकांचा आहे.
#WATCH Congress General Secretary UP-East Priyanka Gandhi Vadra in Bhadohi, on completion of 2 years of Yogi govt, says, 'Report card, promotions, all of it sounds good but there's nothing on ground, I'm meeting people everyday, all the people are in distress. pic.twitter.com/rr6KYbJByT
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019
Congress General Secretary UP-East Priyanka Gandhi Vadra offers prayers at Sita Samahit Sthal in Bhadohi. pic.twitter.com/cb5gDN4bnl
— ANI UP (@ANINewsUP) March 19, 2019
काँग्रेसनं सपा-बसपाला 7 जागा सोडल्यानंतर मायावतींनी हल्लाबोल केला होता. आमचा आणि काँग्रेसचा काहीही संबंध नाही, सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे, त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा दिला आहे. मायावती यांनी ट्विट करत सांगितले की, काँग्रेसने 7 जागा सपा-बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केले आहे. मायावती यांनी काँग्रेसला 80 जागांवर लढावं, असं आव्हान दिलं आहे.