नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:10 PM2019-04-06T17:10:55+5:302019-04-06T17:13:40+5:30

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

priyanka gandhi statement on narendra modi and bjp in ghaziabad | नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी

नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी पाच वर्षांत तुम्ही काय केलं?- प्रियंका गांधी

Next

गाझियाबादः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या कामाचा हिशेब मागण्याऐवजी आपण पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणता यशस्वी निर्णय घेतला, त्याचा लेखाजोगा जनतेसमोर ठेवावा. काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटं बोलत आहेत.

भाजपाच्या पाच वर्षातल्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. ते म्हणतात, नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी तुम्ही काय केलं?, पाच वर्षांत देशातील कोणती कामं केली?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्या म्हणाल्या, स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणं ठोकतात.

पाच वर्षांत वाराणसीतल्या कोणत्या गावात जाऊन आपण गरिबांशी पाच मिनिटं देखील बोललात हेसुद्धा सांगावं, ते पूर्ण जग फिरले आहेत. त्यांनी जपानच्या लोकांची गळाभेट घेतली. अमेरिकेतील लोकांना मिठी मारली, पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, चीनमधल्या लोकांचीही गळाभेट घेतली. परंतु वाराणसीतल्या एकाही गरीब कुटुंबांची कधी गळाभेट घेतलीत काय?, असा प्रश्नही प्रियंका गांधी विचारला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही प्रियंका गांधींनी पंतप्रधानांवर घणाघाती टीका केली आहे. 

Web Title: priyanka gandhi statement on narendra modi and bjp in ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.