अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:00 PM2021-02-06T16:00:50+5:302021-02-06T16:11:56+5:30

raj thackeray : राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबाबत एक मोठा गोप्यस्फोट केलाय

raj thackeray allegations on sharad pawar over electricity bill issue | अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

Next

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वीजबिल दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "राज्य सरकारमधील मंत्री आधी वीजबिल माफ करू म्हटले. पण अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, असं जाहीर केलं. हे सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे", असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. (raj thackeray allegations on sharad pawar over electricity bill issue)

राज ठाकरे यांनी आज नवी मुंबईत बेलापूर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर ठाण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

"वीज कंपन्यांना कोणता फायदा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर हे कसं चालेल? आधी वीजमंत्री म्हणतात वीजबिल माफ करू. त्यानंतर घुमजाव केलं. मग मी राज्यपालांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी मला शरद पवारांशी बोलायला सांगितलं. मी त्यांच्याशीही बोललो", असं राज ठाकरे म्हणाले. 

शरद पवारांशी नेमकी काय चर्चा झाली?
राज्यपालांच्या सल्ल्यानुसार शरद पवारांशी वीजबिलाच्या मुद्द्यावर बोलणं झाल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. "शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएमईबी असेल किंवा टाटा असेला या सर्वांशी शरद पवार बोलणार होते. पण ५-६ दिवसांनी मला कळालं की गौतम अदानी शरद पवारांची भेट घेऊन आले. त्यात काय चर्चा झाली मला माहित नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ होणार नाही, असं जाहीर केलं. त्यामुळे याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे", असं राज ठाकरे म्हणाले. 

सरकार आणि वीज कंपन्यांचं साटंलोटं
राज्य सरकार आणि वीज कंपन्यांचं साटंलोटं असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. "सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं हेच कळत नाही. मुलांच्या परीक्षांचाही ते विचार करत नाहीयत. वीज बिल माफ करण्यासाठी कंपन्यांशी बोलावं लागेल. पण या चर्चाच थांबल्या आहेत. मग यात काहीतरी साटंलोटं असल्याशिवाय चर्चा थांबल्या असतील का? सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करतंय", असं राज ठाकरे म्हणाले. 

अयोध्येचा दौरा निश्चित नाही
राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली होती. पण राज यांनी याबाबत अद्यात कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं. "मी फक्त अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली. अद्याप कोणताही दौरा निश्चित झालेला नाही", असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

पंतप्रधानांनी एक फोन करुन विषय मिटवावा
"कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा", असं राज ठाकरे म्हणाले. 
 

Read in English

Web Title: raj thackeray allegations on sharad pawar over electricity bill issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.