राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...

By प्रविण मरगळे | Published: March 6, 2021 05:08 PM2021-03-06T17:08:35+5:302021-03-06T17:10:22+5:30

MNS president Raj Thackeray's visit to Ayodhya is likely to be postponed: ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सदस्य सुरू होईल, जागोजागी नोंदणी होणार आहे त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन नाही असंही नितीन सरदेसाईंनी सांगितले.

Raj Thackeray Ayodhya tour postponed?; MNS anniversary celebrations canceled this year due to corona | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर?; मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा रद्द, त्याऐवजी राज्यभरात...

Next
ठळक मुद्देदरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होताराज ठाकरे आणि गर्दी हे कायम समीकरण असतं, परंतु ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहेमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापन दिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती होती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येमुळे ठाकरे सरकारनं नियमावली जारी केली आहे, त्यानुसार कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राजकीय, धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचा ९ मार्च रोजी होणारा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.

याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, दरवर्षी ९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा होता, गेल्यावर्षी हा सोहळा वाशीच्या सभागृहात झाला होता, राज ठाकरे आणि गर्दी हे कायम समीकरण असतं, परंतु ही गर्दी टाळण्यासाठी यंदाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

परंतु ९ मार्च रोजी राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते मनसे सदस्य मोहिमेला सुरूवात करतील, पक्षसदस्य नोंदणीचा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सदस्य सुरू होईल, जागोजागी नोंदणी होणार आहे त्यामुळे गर्दीचा प्रश्न उद्भवणार नाही. तसेच अद्याप राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल काही नियोजन नाही असंही नितीन सरदेसाईंनी सांगितले.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा लांबणीवर....?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ९ मार्चच्या वर्धापन दिनापूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र शेतकरी आंदोलनामुळे अद्याप या दौऱ्याचं नियोजन झालं नाही, याबाबत येत्या १-२ दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन तारीख निश्चित केली जाईल अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली.

मास्क न वापरण्यावरून संजय राऊतांनी लगावला होता टोला

पंतप्रधान, मुख्यमंत्री सांगतात मास्क वापरा, तसं राज ठाकरेंनी मास्क का वापरू नये हे पटवून द्यावं, मास्क न वापरणे नागरिकांसाठी धोकादायक आहे, अजित पवारांनीही विधानसभेत तेच सांगितले, ते स्वत: या संकटातून गेलेत, मुख्यमंत्र्यांचा आरोग्यावर चांगला अभ्यास आहे, जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. त्याचे पालन केले पाहिजे, मास्क ही खरी लस आहे. कोरोनामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देतात, सर सलामत तो पगडी पचास, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...तेव्हा वाटतं अरेरे ऐकायला हवं होतं, मास्क घालायला हवा होता, मग आधीच ऐका ना, ते मनसेचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलणार? मास्क का वापरत नाहीत याच ठोस विश्लेषण राज ठाकरेंनी करणं गरजेचे आहे अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.

 

Web Title: Raj Thackeray Ayodhya tour postponed?; MNS anniversary celebrations canceled this year due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.