राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:47 PM2021-03-15T12:47:07+5:302021-03-15T12:47:43+5:30

Raj Thackeray not wearing Mask in Public places: राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्तेच बुचकळ्यात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नुकताच झालेला नाशिक दौरा त्यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे चर्चेला आला. नाशिकचे माजी महापौर अशोक यांनीही त्यानंतर तोंडावरील मास्क खाली ओढला अन पुन्हा एकदा नवीन "राज"कीय वाद उभा राहिला.

Raj Thackeray says 'No Mask', while MNS MLA Raju patil wear masks, workers confused | राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...

राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...

googlenewsNext

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा नुकताच झालेला नाशिक दौरा त्यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे चर्चेला आला. नाशिकचे माजी महापौर अशोक यांनीही त्यानंतर तोंडावरील मास्क खाली ओढला अन पुन्हा एकदा नवीन "राज"कीय (Raj Thackeray politics on mask) वाद उभा राहिला. असे असताना मनसेचे एकमेव आमदार राजू  पाटील (MNS MLA Raju patil) हे मात्र मास्क घालून फिरत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. (MNS MLA Raju patil wear masks against MNS president Raj Thackeray's order.)


कल्याण मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तर राज ठाकरेंचीच भूमिका उचलून धरत रोगप्रतिकारशक्ती चांगली असून आम्ही राज ठाकरे यांनाच फॉलो करतो असे सांगत पालिका प्रशासनाला आव्हान  दिले आहे. या साऱ्या प्रकारात कार्यकर्ते मात्र कोणाचे ऐकावे अशा संभ्रमात पडले आहेत. 


आमदार राजू पाटील हे विविध ठिकाणी दौरे करताना मास्क परिधान करून नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांना विचारले असता " मनसेचे पदाधिकारी कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून काम करत आहेत, आमची इम्युनिटी पावर चांगली असून आम्ही राज यांनाच फॉलो करतो  त्यामुळे मी  सुद्धा मास्क घालत नाही, असे सांगत मास्क घालण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मास्क घालत नाही पण जास्त गर्दीच्या ठिकाणी जाताना मात्र मास्क घालतो,  असे सांगत कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. या दोघांनीही कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. 


याबाबत लोकमतने काही कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला मात्र पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे  सामान्य मनसैनिक  गोंधळलेल्या अवस्थेत असून त्यांनी यावर चुपी साधणेच पसंत केले. 


कल्याण डोंबिवली शहरावर राज ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. या ठिकाणी नेहमीच राज ठाकरे यांचे दौरे सुरू असतात.  त्यातच मनसेचे एकमेव आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे  प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येत्या काही दिवसात राज ठाकरे हे कल्याण डोंबिवलीत येण्याचे काही नियोजन केलेच तर यावेळी त्यांचे स्वागत करताना आमदार राजू  पाटील व इतर पदाधिकारी मास्क परिधान करतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Raj Thackeray says 'No Mask', while MNS MLA Raju patil wear masks, workers confused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.