'मोदी 'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 04:31 PM2019-04-06T16:31:03+5:302019-04-06T16:31:38+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेणार आहे.

raj thackeray will criticize on modi gudi padwa | 'मोदी 'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या'

'मोदी 'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या'

Next

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेतून ते मोदी आणि भाजपाविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. या निमित्तानं मनसेनंही कॅम्पेनिंग सुरू केलंय. या कॅम्पेनिंगच्या व्हिडीओतून मोदींवर शरसंधाण साधण्यात आलं. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले की ते तुमच्यावर देशद्रोहाचा शिक्का मारतील. तरीही आपण त्यांना सामान्य माणसाला होरपळवणाऱ्या नोटाबंदीचा जाब विचारू या, मोदी'शाही'ला गाडू या, चला शिवतीर्थावर जमू या, असा संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे मोदींविरोधात आक्रमक प्रचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मनसेच्या मेळाव्यात 'राज'गर्जना होणार असल्याची दणदणीत जाहिरात पक्षाने केलीय. स्टेजवर राज यांच्यासाठी जे पोडियम आहे, त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन मोठे पडदे असतील.


हे पडदे खास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांसाठी लावण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप दाखवल्या होत्या. तशीच मोदींची आणखी काही भाषणं उद्या ऐकायला मिळू शकतात.

मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी, मोदींच्या विरोधात काम करण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिलेत. यापुढे ज्या सभा घेईन, त्या मोदी-शहांच्या विरोधात असतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही प्रमुख उमेदवारांसाठी राज त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचंही निश्चित झालंय. त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील, हे पक्कं आहे.
आता तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील दोन्ही प्रचारसभांमध्ये थेट शरद पवार यांच्यावर वार केलेत. पुतण्यानेच पवारांची 'दांडी गुल' केली, देशातील हवा पाहूनच पवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशी टोलंदाजी मोदींनी केली होती. त्यामुळे आता राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी कशी बॅटिंग करतात, मोदींची कुठली भाषणं ऐकवतात, मनसैनिकांना काय रणनीती सांगतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

Web Title: raj thackeray will criticize on modi gudi padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.