राज ठाकरे यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' सोशल मीडियावर हिट  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:27 PM2019-04-18T13:27:57+5:302019-04-18T13:29:33+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु असताना त्यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' हे वाक्य सोशल मीडियावर हिट ठरताना दिसत आहे. अनेक यूजर्सनी तर हॅशटॅग करून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत धमाल उडवली आहे. 

Raj Thackeray's style hit the social media | राज ठाकरे यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' सोशल मीडियावर हिट  

राज ठाकरे यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' सोशल मीडियावर हिट  

Next

पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सुरु असताना त्यांचे ''लाव रे तो व्हिडीओ'' हे वाक्य सोशल मीडियावर हिट ठरताना दिसत आहे. अनेक यूजर्सनी तर हॅशटॅग करून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत धमाल उडवली आहे. 

निवडणुका सुरु झाल्यावर सोशल मीडियाच्या मैदानात शब्दांची आणि मिम्सची आतषबाजी बघायला मिळते. काही खोचक आणि विनोदी क्लिप्स आणि फोटोही या काळात व्हायरल झालेले दिसून येत असतात. अनेकदा एखादा शब्द हिट करून त्यावरून कमेंट्सही केल्या जातात. सध्या ठाकरे दमदार भाषण करताना ते काही व्हिडीओ दाखवत आहेत. त्यात भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातील तफावत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. या व्हिडीओ दाखवण्याला चांगला प्रतिसाद मिळत असूनलागोपाठ होणाऱ्या सभांमध्ये ते याच पॅटर्नचा वापर करत आहे. या सभांमध्ये त्यांचे व्हिडिओच्या पूर्वीचे बोलून झाल्यावर संबंधित तंत्रज्ञाला ते लाव रे तो व्हिडीओ असं त्यांच्या शैलीत सांगतात. त्यांची हीच शैलीही श्रोत्यांना भुरळ घालत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या सोशल मिडिआवर त्याचे लाव रे तो व्हिडीओ गाजताना दिसत आहे. 

दरम्यान काल सातारा इथे सभा झाल्यावर आज त्यांची पुण्यात सभा आहे. सिंहगड रस्त्यावर ही सभा होणार असून हा भाग पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघांना जोडणारा असल्याने दोन्ही बाजूच्या नागरिकांसोबत ते संवाद साधणार आहेत. ते पुण्यातल्या सभेत एखादा नवीन गौप्यस्फोट  करणार का याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

Web Title: Raj Thackeray's style hit the social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.