राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 03:46 PM2020-11-16T15:46:23+5:302020-11-16T15:49:58+5:30

जिल्ह्याच्या राजकारणात डावललं जात असल्यानं खोत नाराज असल्याची चर्चा

raju shetty and sadabhau khot likely to come together again | राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

Next

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. खुद्द सदाखाऊ खोत यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आमची विचारधारा एकच आहे. केवळ काही मुद्द्यांवरून आमच्यात मतभेद झाले, असं खोत म्हणाले. खोत यांनी दिलेल्या दिलजमाईच्या संकेतांना राजू शेट्टी सकारात्मक प्रतिसाद देणार का, याची उत्सुकता आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. 

सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 
 

Web Title: raju shetty and sadabhau khot likely to come together again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.