पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गोंधळ, तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार एका दिवसासाठी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:43 PM2021-08-04T14:43:05+5:302021-08-04T14:43:33+5:30
Monsoon Session Of Parliament: तृणमूलच्या या सहा खासदारांनी सभापती एम वेंकैया नायडूंच्या दालनासमोर गोंधळ घातला.
नवी दिल्ली: 19 जुलै रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सरुवात झाली आहे. पण, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पेगास हेरगिरी, कोरोना आणि कृषी कायद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक प्रचंड गदारोळ घालत आहेत. यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाची कार्यवाही स्थगित करावी लागली आहे. आजही या मुद्यांवरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला, त्यामुळे सभापतींनी राज्यसभेच्या 6 खासदारांवर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई केी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सभापती एम वेंकैया नायडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दिलेली नोटिस स्विकार केल्याचं आणि इतर नोटिशी रद्द केल्याचं सांगितलं, त्यानंतर तृणमूलच्या या 6 खासदारंनी वेंकैया नायडू यांच्या दालनासमोर येऊन पेगासस हेरगिरी आणि इतर मुद्यांवर चर्चा करण्याची मागणी करत प्रचंड गोंधळ घातला. यानंतर वेंकैया नायडूंनी कारवाई करत या सहा खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले.
2 वाजेर्यंत कार्यवाही स्थगित
या सर्व गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. दरम्यान, या सहा खासदारांना नियम 255 अंतर्गत एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यापूर्वी नायडून यांनी काही महत्वाचे कागदपत्र सभागृहात सादर केले. तसेच, समाजवादी पार्टीचे रामगोपाल वर्मा, विश्वंभर प्रसाद निषाद आणि माकपाचे डॉ. वी शिवदासन यांच्याकडून नियम 267 अंतर्गत शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यसाठी नोटिस देण्यात आल्याचे सांगितले आणि हे मुद्दे महत्वाचे असल्यामुळे यावर चर्चा करण्याची परवानगी दिली.