Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:39 PM2021-07-07T14:39:53+5:302021-07-07T14:42:00+5:30

Rakesh Tikait: भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे.

rakesh tikait criticised modi govt over inflation in nation | Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

Rakesh Tikait: “महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून इंधनदरवाढ, गॅसच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता अगदी त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच इंधनचे दर कमी होण्याची शक्यताही धूसरच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता भारतीय किसान युनियन आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली असून, महागाईवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे. (rakesh tikait criticised modi govt over inflation in nation) 

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या सात महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. केंद्रीय कृषी कायद्यात दुरुस्ती सूचवा, त्या करू. मात्र, कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही, यावर केंद्र सरकारवर ठाम आहे. याउलट काही झाले, तरी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, तरी यावर ठोस तोडगा निघालेला नाही. यानंतर आता राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेय

सामान्य जनतेचे नुकसान होतेय, शेतकरीही बर्बाद होतोय. सर्व गोष्टी महाग होत चालल्या आहेत. महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय. कंपनी सरकार सुरू असल्याची टीका राकेश टिकैत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. तसेच जोपर्यंत कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत घरी जाणार नाही, याचा पुनरुच्चारही राकेश टिकैत यांनी केला आहे.  

दरम्यान, गतवर्षीच्या २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, असेही राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: rakesh tikait criticised modi govt over inflation in nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.