Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:45 PM2021-06-30T13:45:09+5:302021-06-30T13:47:35+5:30

Ram Mandir News: न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ram Mandir: After the Ram Mandir land purchase dispute, RSS may give the responsibility of overseeing the construction of the temple will go to the Bhaiyaji Joshi | Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

Ram Mandir: राम मंदिर जमीनखरेदी वादानंतर संघ दक्ष, मंदिर निर्मिती देखरेखीची जबाबदारी बड्या नेत्याकडे जाणार

Next

नवी दिल्ली - न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचदरम्यान राम मंदिरासाठी जमीन खरेदीवरून झालेला वाद आणि आरोपांमुळे राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टच्या कामावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सक्रिय झाला असून, मंदिराच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्यांमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. (After the Ram Mandir land purchase dispute, RSS may give the responsibility of overseeing the construction of the temple will go to the Bhaiyaji Joshi)

सूत्रांच्या म्हणण्यानुसार याआधीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह राहिलेल्या भैयाजी जोशी यांच्याकडे आता राम मंदिर निर्मिती प्रकल्पाची जबाबदारी दिली जाऊ शकते. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सध्याचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे सुद्दा उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये प्रवास करणार आहेत. कुठल्याही प्रकारची विरोधी वातावरण निर्मिती होऊ नये यासाठी राममंदिराच्या बांधकामासंबंधीचा विवाद संपुष्टात आणण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी राम मंदिराशी संबंधित जमिनीची खरेदी करण्यावरून एका वादाला तोंड फुटले होते. श्री राम मंदिर जन्मभूमी ट्रस्टने जी जमीन खरेदी केली होती. त्यामध्ये गडबड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या मुद्द्यावरून श्री राम जन्मभूमी निर्मिती ट्रस्ट आणि भाजपाला टीकेचे लक्ष्य केले होते.

श्री राम जन्मभूमी ट्रस्टने एक जमीन साडे १८ कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र त्या जमिनीची किंमत २ कोटी रुपये होती, असा आरोप करण्यात आला होता. त्याशिवाय इतर अन्य आरोपही लावण्यात आले होते.  

Web Title: Ram Mandir: After the Ram Mandir land purchase dispute, RSS may give the responsibility of overseeing the construction of the temple will go to the Bhaiyaji Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.