महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका

By मोरेश्वर येरम | Published: November 28, 2020 05:13 PM2020-11-28T17:13:53+5:302020-11-28T17:23:23+5:30

रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर वीजबिल माफी, कोरोना संकट, कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन धारेवर धरलं आहे.

Ramdas Athavale slams maharashtra government says people will declare fail to this govt | महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका

महाविकास आघाडी सरकारला जनता नापास ठरवेल, रामदास आठवलेंची टीका

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारला जनता १०० पैकी ३० गुण देईल, रामदास आठवलेंचं मतमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही रामदास आठवलेंनी साधला निशाणाकंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आठवलेंचा आरोप

मुंबई
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ''महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीला १०० पैकी किती गुण द्याल असा जनतेला प्रश्न विचारला तर जनता केवळ ३० गुण देऊ महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार ठरवेल'', असं ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे. 

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, फडणवीसांची टीका

रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारवर वीजबिल माफी, कोरोना संकट, कंगना राणौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणावरुन धारेवर धरलं आहे. ''कोरोना संकटाचा मुकाबला करताना निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई, वीजबिल माफीवरुन जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक, अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणी दिसलेली सुडबुद्धी ही राज्य सरकारला शोभणारी कामगिरी नाही", असं आठवले म्हणाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा असल्याचंही ते पुढे म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
"लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो. प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर द्यायचे असते. त्यांना उलटपक्षी प्रश्न का विचारतो म्हणून जाब विचारायचा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धवून मागे लागणार अशी विरोधकांना धमकीची भाषा वापरणे ही भूमिका समर्थनीय नसून लोकशाहीला मारक आहे'', असं रामदास आठवले म्हणाले आहेत. 

Web Title: Ramdas Athavale slams maharashtra government says people will declare fail to this govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.