“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:55 AM2021-08-14T11:55:36+5:302021-08-14T11:59:43+5:30

आता रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले आहे.

ramdas athawale predicts about shiv sena future and says sena should reunite with bjp | “...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

“...नाहीतर शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”; रामदास आठवलेंचा सूचक इशारा

Next
ठळक मुद्देमहाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतातनाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईलरिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे भाकित

अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण अनेकविध मुद्द्यांमुळे तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोनाची परिस्थिती आणि निर्बंध, महागाई यांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले असून, शिवसेनेला २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे म्हटले आहे. (ramdas athawale predicts about shiv sena future and says sena should reunite with bjp)

शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावे, अजूनही वेळ गेली नाही, अशी इच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रामदास आठवले यांनी शिवसेनेचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार, यावर भाकित केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

“मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ED आणि CBI लावू”; मिलिंद नार्वेकरांना धमकी

शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारायचे असेल तर...

महाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतात. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचं असेल तर यांनी एकमेकांमध्ये कोपरखळ्या मारण्याचं थांबवल पाहिजे. तसेच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारायचे असेल आणि आपले मतदार जपायचे असतील तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल, असे भाकित रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

दरम्यान, राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले आहेत, असे दावा करत यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे, असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला आहे.
 

Read in English

Web Title: ramdas athawale predicts about shiv sena future and says sena should reunite with bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.