रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती; संजय राऊतांनी व्य़क्त केले आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:37 AM2021-03-26T10:37:50+5:302021-03-26T10:45:58+5:30

Sanjay Raut On Rashmi Shukla's Phone tapping Case: पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला.

Rashmi Shukla phone tapping were known to all from Pawar; Sanjay Raut advises Thackeray government | रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती; संजय राऊतांनी व्य़क्त केले आश्चर्य

रश्मी शुक्लांची कारस्थाने पवारांपासून सर्वांना माहिती होती; संजय राऊतांनी व्य़क्त केले आश्चर्य

Next

ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Sanjay Raut talk on Sitaram kunte's Report on Phone tapping by Rashmi shukla.)


पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले. 


सीताराम कुंटेंनी काल एक अहवाल दिला आहे. त्यामध्ये फोन टॅपिंगबाबत मोठे खुलासे आहेत. भाजपाला फायदा होईल, राजकीय फायद्यासाठी हे अधिकारी आमदारांचेच नाही तर खासदार आणि पत्रकारांचेही फोन टॅप करत होते. पत्रकारांना काय माहिती आहे हे त्यांना हवे होते. शरद पवारांचे फोन टॅप केले गेले, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार जे बसलेय त्यांना या गोष्टीचे गांभीर्य समजायला हवे. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून राज्य करता येत नाही. ती एपीआयपासून पोलीस अधिऱ्यापर्यंत कशी बगलेत दबली जाते ते पाहिलेय. सरकारने यातून बोध घ्यावा, असा इशारा राऊत यांनी दिला. 


ममतांच्या प्रचाराला जाण्य़ाचा विचार...
शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.  
 

Web Title: Rashmi Shukla phone tapping were known to all from Pawar; Sanjay Raut advises Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.