राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 12:50 PM2020-07-28T12:50:46+5:302020-07-28T12:57:45+5:30

४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करु, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करु असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

Ready to come together but fight elections separately Says BJP Chandrakant Patil over Shiv Sena | राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार, पण निवडणुका वेगळ्या लढू; शिवसेनेबाबत भाजपाचं मोठं विधान

Next
ठळक मुद्देआमची व्होटबँक वापरून मोदींचा चेहरा वापरून निवडून यायचं दुसऱ्याबरोबर संसार करायचा हे आम्हाला मान्य नाहीयापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडत आहे, आगामी काळात जर शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत पण निवडणुका वेगळ्या लढू असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितले. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप ४ वर्ष आहेत, यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल, केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच सध्या आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, कोरोना काळात जो भ्रष्टाचार सरकारने केला त्याचा बुरखा फाडणार आहोत. ४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करु, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करु असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

आमची व्होटबँक वापरून मोदींचा चेहरा वापरून निवडून यायचं आणि दुसऱ्याबरोबर संसार करायचा हे आम्हाला मान्य नाही, आम्हाला आमच्या ताकदीवर निवडणुका लढवायच्या आहेत, २०१४ वेगळे लढले म्हणून पुन्हा एकत्र आले, हिंमत असेल वेगळ्या निवडणूका लढवून दाखवा, तुमच्या फक्त १० जागा येतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे भाजपाच्या विधानावर शिवसेना काय भूमिका घेते यावर जनतेचं तसेच महाविकास आघाडीच्या इतर पक्षांचे लक्ष लागून राहिलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण

सोन्याच्या दराने बनवला नवा रेकॉर्ड तर चांदीही करणार मालामाल; जाणून घ्या आजचे दर

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; राज्याला दिला १९ हजार २३३ कोटी जीएसटी परतावा

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ यांची उडी; गृहमंत्री अनिल देशमुखांची घेतली भेट

Read in English

Web Title: Ready to come together but fight elections separately Says BJP Chandrakant Patil over Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.