Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:39 PM2021-04-19T12:39:08+5:302021-04-19T12:43:13+5:30
BJP Kirit Somaiya Slams Nawab Malik: लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला सोमय्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर कंपन्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने १६ कंपन्यांना दिल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मात्र त्या १६ कंपन्या कोणत्या याबाबत खुलासा करावा असं चॅलेंज भाजपानंनवाब मलिकांना दिलं होतं.(BJP Kirit Somaiya Target NCP Nawab Malik over allegations of Remdesivir Injection Stock)
त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांवर टीका करताना म्हटलंय की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. ४८ तास झाले कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? मोदी सरकारनं प्रतिबंध केलेले पत्र? खोटं बोलणं थांबवा आणि स्टंटबाजी थांबवा. लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला त्यांनी लगावला आहे.
ठाकरे सरकारचे मंत्री @nawabmalikncp यांनी आरोप केला की, पंतप्रधान @narendramodi जींनी महाराष्ट्राला रेमडिसिव्हर देण्यावर प्रतिबंध लावला. ४८ तास उलटून गेलेत कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? कुठे आहे मोदी सरकारच प्रतिबंध करणार पत्र ?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 19, 2021
- @KiritSomaiyapic.twitter.com/9V30GDSTos
नवाब मलिकांनी काय आरोप केला?
केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती.
दरम्यान राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला होता.