Remdesivir: दुपारी मंत्र्यांच्या ओएसडीचा फार्मा कंपनीच्या मालकाला धमकीचा फोन, रात्री ताब्यात; फडणवीसांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 01:19 AM2021-04-18T01:19:07+5:302021-04-18T02:27:39+5:30
Remdesivir issue, Devendra Fadanvis talk on Police detained Daman's company Bruck pharma owner at night: रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्तांची भेट घेत जाब विचारला.
रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमनच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला. या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली नव्हती तर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, असे उपाआयुक्तांनी सांगितल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. (Devendra Fadanvis talk on Police detained Daman's company Bruck pharma owner at saturday night in Remdesivir injection politics)
प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फार्मा (Bruck pharma ) कंपनीत दमनला गेले होते. महाराष्ट्राला रेमडेसीवीर द्या अशी विनंती केली होती. यावर कंपनीने सांगितलेले की, आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आमच्याकडील साठा महाराष्ट्राला देण्यास तयार आहोत. यानुसार केंद्राला आम्ही विनंती केली की परवानगी द्यावी लागेल. यावर त्यांच्याशी टायअप करून देतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या लायसनवर परवानगी मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्या कंपनीने जे रेमडेसीवीर इंजेक्शन बनविवले होते त्याला दमनच्या एफडीए आणि राज्याच्या एफडीएची परवानगी हवी होती. ती दिली गेली. दुपारच्यावेळी मंत्र्यांचे ओएसडी यांनी मालकाला फोन करून धमकी दिली. असे कसे देवेंद्र फडणवीस, दरेकरांच्या सांगण्य़ावरून रेमडेसीवीर देत आहात. रात्री ९ वाजता आम्हाला मेसेज आला की १० पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून आणले. हे कसले राजकारण सुरु आहे. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. परंतू जे काही सुरु आहे ते दिसतेय, असा आरोप फडणवीस यांनी केला.
DCP told us that they received inputs that some exporters had 60,000 vials &wanted to verify the same. We showed them permission letter. He (DCP) said it wasn't communicated to them. Whatever happened was wrong: Maharashtra LoP Devendra Fadnavis on arrest of (Remdesvir) supplier
— ANI (@ANI) April 17, 2021
डीसीपी आता सांगत आहेत की, टीप मिळाली होती, की ६०००० इंजेक्शन त्यांच्याकडे आहेत. यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले. आम्ही त्यांना अटक करणार नव्हतो. चौकशीला बोलावले होते. राज्याला रेमडेसीवीर पाठविण्याची वेळ असताना त्या कंपनीच्या मालकाला इथे आणून बसविण्यात आले. हे कसले राजकारण आहे? जर ते सर्व परवानगी घेऊन राज्याला रेमडेसीवीर देत असतील आणि जर त्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर हे चुकीचे आहे, सहन केले जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आता त्या व्यक्तीला पोलिसांनी सोडले आहे. आपण पोलिसांवर विश्वास ठेवू, असेही फडणवीस म्हणाले.