'याद राखा पंतप्रधान कोण आहेत...' तालिबानचं कौतुक करणाऱ्यांना भाजपा नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:55 AM2021-08-19T11:55:54+5:302021-08-19T11:58:39+5:30

Swatantra Dev Singh News: उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अफगाणिस्तानातील तालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या नेत्यांना फटकारलंय.

'Remember who is the Prime Minister ...' BJP leader swatanta dev singh warns those who praise Taliban | 'याद राखा पंतप्रधान कोण आहेत...' तालिबानचं कौतुक करणाऱ्यांना भाजपा नेत्याचा इशारा

'याद राखा पंतप्रधान कोण आहेत...' तालिबानचं कौतुक करणाऱ्यांना भाजपा नेत्याचा इशारा

googlenewsNext

लखनऊ:उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी अफगाणिस्तानातीलतालिबानी दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या नेत्यांना फटकारलंय. समाजादी पार्टीचे खासदार शफीकुर रहमान बर्क आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) चे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या बाजूनं वक्तव्यंत केलं होत्. त्या दोघांना स्वातंत्र देव यांनी कडक शब्दात इशारा दिला.

तालिबानच्या बाजूने वक्तव्य करणाऱ्यांना इशारा देताना स्वतंत्र देव म्हणाले की, 'उत्तर प्रदेशातील जे लोक दहशतवाद्यांची शुभचिंतक बनत आहेत, त्यांनी याद राखा की, देशाचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोणत आहेत...', अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.

नेमकं प्रकरण काय आहे ?
काल म्हणजेच बुधवारी AIMPLB चे सदस्य मौलाना सज्जाद नोमानी यांनी तालिबानला विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. एवढेच नाही तर नोमानी यांनी तालिबान्यांना सलामही केला होता. तर, त्यापूर्वी सपा खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी तालिबानची तुलना भारतीय स्वातंत्र्य संग्रामाशी केली होती. बर्क यांच्या या वक्तव्यानंतर यूपी पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 'Remember who is the Prime Minister ...' BJP leader swatanta dev singh warns those who praise Taliban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.