प्रतिबंधात्मक नोटीसांमुळे साहित्यिक वर्तुळात संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:02 AM2019-04-17T01:02:59+5:302019-04-17T01:03:07+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्कुस डाबरे यांना सोमवारी पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटीसा पाठवल्या गेल्यामूळे मोठी खळबळ उडाली होती

Resistance to the literary circle due to restrictive notices | प्रतिबंधात्मक नोटीसांमुळे साहित्यिक वर्तुळात संताप

प्रतिबंधात्मक नोटीसांमुळे साहित्यिक वर्तुळात संताप

Next

वसई : पालघर लोकसभा निवडणूक मतदानासाठी अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना वसईतील प्रसिद्ध साहित्यिक सायमन मार्टीन व हरित वसईची चळवळ उभारणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मार्कुस डाबरे यांना सोमवारी पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटीसा पाठवल्या गेल्यामूळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर जनक्षोभ उसळल्यानंतर पोलिसांनी या नोटीसा परत घेतल्या. हा प्रकार पोलिसांची दडपशाही असून ही आणीबाणीची सुरवात आहे अशी संतप्त प्रतिक्रि या मार्टीन यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या, निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्यांना पोलिसांकडून भारतीय दंड प्रक्रि या संहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजाविण्यात येतात. वसईमध्ये अनेकांना या नोटिसा पाठविण्यात आल्या मात्र, प्रसिध्द कवी, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टीन यांना देखील ही प्रतिबंधात्मक नोटीस पाठविण्यात आली आहे. आपल्या हातून दखलपात्र गुन्हा घडण्यास, हस्तकांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. मार्टीन यांच्याप्रमाणेच हरित वसईची चळवळ उभारणारे मार्कुस डाबरे यांनाही पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
सायमन मार्टीन हे राज्य आणि केंद्र शासना पुरस्कारप्राप्त साहित्यिक असून सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. अशाप्रकारे त्यांना नोटिसा दिल्याने साहित्यिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसई पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्या सहीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे समाजात उपद्रव मूल्य असणाºया तसेच ज्यांच्यामूळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा व्यक्तींना या नोटीसा पाठवल्या जातात. मात्र समाजकंटकांना ज्या भाषाशैलीत नोटीसा पोलिसांकडून जारी करण्यात येतात, त्याच भाषेत या नोटीसा आल्याने वसईत सगळीकडे संतप्त प्रतिक्र ीया उमटू लागल्या होत्या. त्यामूळे जनक्षोभानंतर पोलिसांनी यु टर्न घेत या नोटीसा चूकून पाठवल्या गेल्या असे सांगत त्या मागे घेतल्या वसईतील सहा पोलिस ठाण्यातून एकूण ८०४ जणांना तर वसई पोलिस ठाण्यातून ११० जणांना या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. याबाबत पालघर अधिक्षक गौरव सिंग यांनी नोटीसा चुकून पाठवल्या गेल्या असून त्या मागे घेत असल्याचे सांगीतले आहे.
>मार्कुस डाबरे, डॉमनिका डाबरे यांनाही नोटीसा
वसई पोलिसांनी हरित वसईचे अध्यक्ष मार्कुस डाबरे, सामाजिक कार्यकर्त्यां डॉमनिका डाबरे यांनाही नोटिसा पाठवल्या आहेत. वसईतील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५० जणांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ही सरकारची मुस्कटदाबी असून याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रि या मार्कुस डाबरे यांनी दिली. आजवर अनेक निवडणुका झाल्या. मात्र असा प्रकार पहिल्यांदा होत असून जनतेची गळचेपी करण्याची करण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.
>मला नोटीस हातात मिळाल्यानंतर मोठा धक्का बसला. ही आणीबाणीची सुरवात झाली आहे .मी कुठल्या पक्षात नाही, कुठल्या पक्षाचा प्रचार करत नाही. राजकारणाचा माझा संबंध नाही, तरी मला ही नोटीस पोलिसांनी का पाठवली ? माझ्या नावावर एकही अदखलपात्र गुन्हा नाही, आंदोलनाचेही गुन्हे नाही मग मला अशी नोटीस पाठवून पोलीस ही दडपशाही करू पहात आहे.
- सायमन मार्टीन

Web Title: Resistance to the literary circle due to restrictive notices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.