रामदास आठवले यांच्या काव्याने श्रोते खुश : ही आहे नवी कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:34 PM2019-04-20T22:34:28+5:302019-04-20T22:37:51+5:30
महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते
पुणे :महाराष्ट्राचे कवी, राजकारणी असलेले आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कवितेतून प्रचार केला.युतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रासपचे महादेव जानकर, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की ,
कांचन कुल यांचा निवडून येण्याचा दूर नाही फासला
कारण त्यांच्या पाठीमागे उभी आहे खडकवासला
बारामतीचा प्रत्येक माणूस राष्ट्रवादी हरत असल्यामुळे मनात हसला
कारण अनेक वर्षांपासून त्यांनी खूप त्रास सोसला
खुलणार आहे कमळाचे फुल
मजबूत होणार बारामतीचा पूल
बारामतीत निवडून येणार कांचन कुल
आरपीआयची ज्यांना मिळते साथ,
मजबूत होत त्याचे हात
जयभीमची आहे आमची जात,
म्हणून करणार काँग्रेस, राष्ट्रवादीवर मात
देवेंद्र फडणवीस आहेत तुमचे वाली
मग कशासाठी खुर्च्या खाली
कितीही लावा तुम्ही जय महाराष्ट्र, जय भीमचे नारे
पण आमच्या पाठीशी आहेत विजय शिवतारे
(राहुल गांधींना उद्देशून )
सारखं करता तुम्ही राफेल राफेल,
राहुल गांधी तुम्ही राहू नका गाफील
तुम्हाला मोदींच्या विरोधात बोलायचं ते बोला
पण आम्ही मारतो टोला
त्यांना माहिती नव्हती माझी किंमत
मी भाजप सेनेत आल्यावर पाहिली माझी हिंमत
आज सुटलेली आहे चांगली हवा
कारण खडकवासल्यात इतिहास घडणार नवा
(कवी रामदास आठवले)