मिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये प्रवेश करणार?; मोहन भागवतांनी घेतलेल्या "त्या" खास भेटीमुळे चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:51 AM2021-02-16T10:51:53+5:302021-02-16T13:07:36+5:30
RSS Mohan Bhagwat And Mithun Chakraborty : मोहन भागवत हे मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी कोलकात्यातील त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत ( Mohan Bhagwat) यांनी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची भेट घेतली आहे. मंगळवारी सकाळी भागवत हे मिथुन चक्रवर्तींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. पश्चिम बंगालमध्ये येत्या काही काळात निवडणुका असल्याने या निवडणुकीआधी मोहन भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या खास भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या भेटीमुळे चक्रवर्ती यांचा भाजपा प्रवेशाच्या चर्चेला देखील पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
2019 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील भेट घेतली होती. मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसतर्फे राज्यसभेवर गेले होते. मात्र सदनात सतत अनुपस्थित राहात असल्याने त्यांनी 20 महिन्यांतच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणापासून दूरच आहेत. यानंतर आता गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेल्या मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांच्या खास भेटीने विविध चर्चांना उधाण आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जेएनयूमधील आंदोलनानंतर केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील प्रमुख चेहरा बनलेले कन्हैया कुमार आणि भाकपामधील संबंध गेल्या काही काळात बिघडले आहेत. त्यातच आता भाकपा नेते असलेल्या कन्हैया कुमार यांनी नितीश कुमार यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कन्हैया कुमार हे डाव्यांची साथ सोडून जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
Toolkit Case : टूलकिट प्रकरणी तपासातून महत्त्वाची माहिती समोर; दिल्ली पोलिसांनी केला मोठा दावा, म्हणाले...https://t.co/6oU6XRZ9b1#DishaRavi#DishaRaviArrested#GretaThunberg#ToolkitCase#FarmersProstests
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021
कन्हैया कुमार डाव्यांची साथ सोडणार? नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयाची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी भाकपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात एक प्रस्ताव पारित केला होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाशी संबंधित एका अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीनंतर कन्हैयावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांची भेट झाल्याने या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. दरम्यान, कन्हैया कुमार आणि अशोक चौधरी यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी ही भेट अराजकीय असल्याचे म्हटलं आहे. दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ही भेट झाल्याचे या सूत्रांनी म्हटलं. मात्र भाजपाकडून राज्यमंत्री झालेल्या सुभाष सिंह यांनी या भेटीवर टीका केली आहे. त्यांनी कन्हैया कुमारचा उल्लेख मानसिक रुग्ण असा केला असून, अशी भेट अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
"देशाचं धोरण संसदेतून नव्हे तर रस्त्यावरून बदलू", राकेश टिकैत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/RjTVG8Jkbr#FarmersProstests#FarmersBill2020#RakeshTikait#NarendraModi#LalKrishnaAdvanipic.twitter.com/D6PEni8Y9p
— Lokmat (@MiLOKMAT) February 16, 2021