Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:46 PM2021-07-08T14:46:41+5:302021-07-08T14:49:32+5:30

Cabinet Expansion: सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे.

rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama | Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

Cabinet Expansion: “मोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार का”

Next
ठळक मुद्देकेंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलावर टीकामोदी कॅबिनेटमधील फेरबदलामुळे जनतेच्या जीवनात काही फरक पडणार कानिवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांचा मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांच्या समावेशासह अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. यानंतर आता विरोधकांसह अनेक स्तरातून यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले. मात्र, त्याने सामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडणार आहे का, फेरबदलाची नौटंकी करण्यापेक्षा जनतेचे जीवन सुधारण्यावर भर हवा, अशी टीका करण्यात आली आहे. (rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama)

निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर निशाणा साधला आहे. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात काटजू यांनी केंद्रीय कॅबिनेटमधील ताजा फेरबदलाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेकांनी याचे कौतुक केले आहे. मात्र, वास्तविकता काय आहे, यामुळे सामान्य जनतेचे जीवन सुधारणार आहे का, लोकांना चांगले आयुष्य मिळणार का, अशी विचारणा काटजू यांनी केली आहे. 

चेहरे बदल्यामुळे परिस्थिती बदलणार का?

मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशभरात व्यापक प्रमाणात असलेली गरिबी, बेरोजगारी, महागाई, कुपोषण, आरोग्य सेवा आणि चांगल्या शिक्षणाचा अभाव, शेतकऱ्यांवरील संकट, भ्रष्टाचार, दलित आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचार यांसारख्या समस्या दूर होणार आहेत का, याचे उत्तर नकारार्थीच आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार हे केवळ एक नाटक आहे. 

जनक्रांती आणि जनसंघर्षाची गरज

भारतातील आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी आधुनिक विचारांच्या नेत्यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक जनसंघर्ष आणि जनक्रांती करण्याची गरज आहे. यासाठी मोठा कालावधी जावा लागेल. अनेक त्याग करावे लागतील. मात्र, प्रत्येक प्रामाणिक देशभक्ताने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे काटजू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर, १२ मंत्र्यांचे राजीनामेही घेण्यात आले आहेत. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रीमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: rtd justice markandey katju says modi cabinet expansion is drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.