Sachin Vaze: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी; जयंत पाटलांनी दिलं चोख उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:16 PM2021-03-15T16:16:17+5:302021-03-15T16:28:18+5:30
BJP Demand for Anil Deshmukh Resignation in Sachin Vaze Case:शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या प्रकरणाचा तपास NIA कडून केला जात आहे, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे, आता या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.(BJP MLC Prasad Lad Demand for Anil Deshmukh Resigination in Sachin Vaze Case)
याबाबत प्रसाद लाड म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणात रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येतात, या प्रकरणात दोन डीसीपींची नावेही बाहेर पडणार आहे, या प्रकारामुळे मुंबई पोलिसांची नाचक्की होत आहे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणारे कोण? सचिन वाझे यांना पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विधान परिषदेत केली होती, जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाही तोवर या प्रकरणाचा छडा लागणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच शरद पवार हे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांचा पक्षाचा गृहमंत्री गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खेदजनक आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केली.
सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येतायत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा! @AnilDeshmukhNCP@BJP4Maharashtrapic.twitter.com/qkX8I7wzTP
— Prasad Lad (@PrasadLadInd) March 15, 2021
गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची गरज नाही – जयंत पाटील
सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांनीही कोणतीही चूक केली नाही, सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA करत आहेत. सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, जे कोणी चुकीचे वागले असतील तर त्यांना शिक्षा होईल असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. . (NCP state president Jayant Patil has Supported Home Minister Anil Deshmukh)
मंत्रिमंडळ फेरबदल नाही
मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याची कोणतीही चर्चा नाही, कोणी कितीही संकेत दिले तरी ते राष्ट्रवादी पक्षांतर्गंत मंत्रिमंडळ खातेबदलावर चर्चा नाही असं सांगत जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा फेटाळली.