Sachin Vaze Case : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले, कितीही मोठं नाव असलं तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:21 PM2021-03-15T20:21:12+5:302021-03-15T20:57:35+5:30

Sharad Pawar reaction on Sachin Vaze Case in the NCP meeting : यएने (NIA) कारवाई करत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case)यांना अटक केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली आहे.

Sachin Vaze Case: Sharad Pawar make clear in the NCP meeting, he said, No matter how big the name, change it | Sachin Vaze Case : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले, कितीही मोठं नाव असलं तरी...

Sachin Vaze Case : राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका, म्हणाले, कितीही मोठं नाव असलं तरी...

Next

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवसस्थानाशेजारी सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ, त्यानंतर या स्कॉर्पिओ मालकाचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि पुढे या प्रकरणात एनआयएने (NIA) कारवाई करत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case)यांना केलेली अटक यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हे अॅक्टिव्ह झाले आहे. तसेच त्यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्पष्ट सूचना दिली आहे. (Sharad Pawar make clear in the NCP meeting, he said, No matter how big the name, change it)

सचिन वाझे प्रकरणी काही दिवसांपूर्वी विचारल्यानंतर हा स्थानिक प्रश्न असल्याचे सांगत वेळ मारून नेणाऱ्या शरद पवार यांनी आता मात्र या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीमध्येही या प्रकरणी विचारविमर्ष केला. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेणाऱ्या शरद पवार यांनी या प्रकरणात ज्यांची नावं समोर येतील त्यांची बदली करा. यात समोर येणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव कितीही मोठं असलं तरी त्याची बदली करा, अशी स्पष्ट सूचना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात सरकारवर विरोधकांकडून होत असलेल्या बोचऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र राज्याचे गृहमंत्री बदलण्यात येणार नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पक्षाच्या बैठकीपूर्वी सांगितले होते. दरम्यान बैठकीनंतर अनिल देशमुख यांना बदलण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 

सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री अनिल देशमुख हे योग्य प्रकारे काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते. 

Web Title: Sachin Vaze Case: Sharad Pawar make clear in the NCP meeting, he said, No matter how big the name, change it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.