Sachin Vaze Case : त्या आरोपांवरून शिवसेना नेते अनिल परब यांचे नितेश राणेंना प्रतिआव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:11 PM2021-03-15T19:11:14+5:302021-03-15T19:13:00+5:30

Shiv Sena leader Anil Parab's reply to Nitesh Rane : नितेश राणे यांनी जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही आता सर्वस्वी त्यांचीच असेल. (Sachin Vaze Case)

Sachin Vaze Case : Shiv Sena leader Anil Parab's reply to Nitesh Rane on those allegations, said ... | Sachin Vaze Case : त्या आरोपांवरून शिवसेना नेते अनिल परब यांचे नितेश राणेंना प्रतिआव्हान, म्हणाले...

Sachin Vaze Case : त्या आरोपांवरून शिवसेना नेते अनिल परब यांचे नितेश राणेंना प्रतिआव्हान, म्हणाले...

Next

मुंबई - भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याशी असलेल्या संबंधांवरून आज वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच शिवसेनेचा पश्चिम उपनगरातील नेता सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांच्यासोबत टेलिग्रामवरून संपर्कात होता, असा दावा नितेश राणे यांनी केला होता. दरम्यान, या आरोपांना आता वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी उपस्थित असलेले शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले आहे. (Shiv Sena leader Anil Parab's reply to Nitesh Rane on those allegations, said ...)

नितेश राणे यांनी जे आरोप केले आहेत, ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही आता सर्वस्वी त्यांचीच असेल. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीची मागणी केली आहे. त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेने आमची चौकशी करावी, तसेच नितेश राणे यांनी नुसते आरोप न करत सचिन वाझे यांच्या संपर्कात असलेला शिवसेनेचा जो कोणी नेता पश्चिम उपनगरातील नेता कोण, त्याचे नाव सांगावे, त्याबाबतचे पुरावे द्यावेत, असे प्रतिआव्हान अनिल परब यांनी दिले आहे.   

आमचं म्हणणं आहे की नितेश राणेंनी फक्त खोटेनाटे आरोप करून राजकीय आयुष्य उध्वस्त करू नये. या कारणास्तव भरून सरदेसाई यांनी त्याला उद्या कायदेशीर नोटीस देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आर्थिक कायदेशीर नोटीस जाईल. कायदेशीर कारवाईला त्यांना उत्तर द्यावेच लागेल आणि त्याच्यासमोर तपास यंत्रणेच्या समोर जे पुरावे द्यायचे ते त्यांनी द्यावेत, असे अनिल परब म्हणाले. 

दरम्यान, वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील संभाषणाची माहिती एनआयएने घ्यावी. वरुण सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे याची माहिती एनआयएने घ्यावी. तसेच हे फोन कुणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले. कुणी त्याला फोन करायला सांगितले, याची माहिती समोर आली पाहिजे. वाझेचे सीडीआर रिपोर्ट, व्हॉट्सअॅप कॉलचे रिपोर्ट असतील. वाझे आणि सरदेसाईमधील संभाषण तपासले पाहिजे. वाझेचं संभाषण तपासणं जमत नसेल तर वरुण सरदेसाईंचं संभाषण तपासा. या महिन्यात त्यांचं बोलणं झालं होतं का याची माहिती घ्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.

Web Title: Sachin Vaze Case : Shiv Sena leader Anil Parab's reply to Nitesh Rane on those allegations, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.