Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणात आता ठाकरेंच्या नातेवाईकाचेही नाव, नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंवर सनसनाटी आरोप, केली चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 03:10 PM2021-03-15T15:10:49+5:302021-03-15T15:17:00+5:30

Close relationship between Sachin Waze and Varun Sardesai Nitesh Rane's sensational allegations : भाजपा नेते नितेश राणे यांनी वाझे प्रकरणावरून थेट ठाकरे कुटुंबालाच लक्ष्य केले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि उद्धव ठाकरेंचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचे निकटचे संबंध असल्याचा केला आरोप

Sachin Vaze: Now Thackeray's relative's name in Sachin Vaze case, Nitesh Rane's sensational allegations against Varun Sardesai, demands inquiry | Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणात आता ठाकरेंच्या नातेवाईकाचेही नाव, नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंवर सनसनाटी आरोप, केली चौकशीची मागणी

Sachin Vaze : सचिन वाझे प्रकरणात आता ठाकरेंच्या नातेवाईकाचेही नाव, नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंवर सनसनाटी आरोप, केली चौकशीची मागणी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे संपादक सचिन वाझेंचा बचाव का करतात, त्याच्यामागे काही कारणं आहेतकारवाई टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला दीडशे कोटी रक्कम द्या, अशी मागणी सचिन वाझे यांनी सट्टेबाजांचकडे केली होतीत्यानंतर वरुण सरदेसाई यांनी सचिन वाझेंना फोन करून यात आमचा वाटा किती अशी विचारणा केली होती

मुंबई - मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. वाझेंना १० दिवसांची एनआयए (NIA) कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे आज पोलीस दलामधून निलंबन करण्यात आलं आहे. त्यातच आता भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वाझे प्रकरणावरून थेट ठाकरे कुटुंबालाच लक्ष्य केले आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचे निकटचे संबंध असून, त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे संपादक सचिन वाझेंचा बचाव करत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.  (Now Thackeray's relative's name in Sachin Vaze case, Nitesh Rane's sensational allegations against Varun Sardesai, demands inquiry)

मुंबईत आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्यांकडून वाझेंनी मागितलेल्या रकमेमधून सरदेसाई यांना आपला हिस्सा मागितला होता, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे संपादक सचिन वाझेंचा बचाव का करतात, त्याच्यामागे काही कारणं आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सचिन वाझेची वकिली  का करतात, याची उत्तरं माझ्याकडे आहे. गतवर्षी आयपीएलची स्पर्धा भरवली गेली. सचिन वाझे प्रकरण या स्पर्धेशी कसं निगडित आहे याची माहिती मला तुमच्यापुढे मांडायची आहे. आयपीएल चांगल्या उद्देशाने आयोजित केली जात असली तरी त्यात अनधिकृतरीत्या सट्टा, बेटिंग घेतली जाते. या स्पर्धेपूर्वी मुंबईतील बेटिंग सट्टा घेणाऱ्यांना सचिन वाझेंचा फोन गेला. तुमच्याबाबत आमच्याकडे सगळी माहिती आहे. जर कारवाई टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला दीडशे कोटी रक्कम द्या, अशी मागणी केली गेली. तसे न केल्यास तुमच्यावर छापे मारले जातील आणि तुमची बदनामी आणि अटक करू अशी मागणी केली गेली. वाझेंनी ही रक्कम मागितल्यानंतर वाझेंना अजून एका व्यक्तीचा फोन गेला. त्या व्यक्तीने या रकमेतील आमचा वाटा किती, अशी विचारणा त्या व्यक्तीने केली. या व्यक्तीचे नाव मी विधिमंडळात घेतलं होतं. ती व्यक्ती मंत्रालयापासून सगळीकडे वावरत असते. मुंबई पालिकेतील टेंडर्स त्याच्याच नावे निघतात. ती व्यक्ती म्हणजे वरुण सरदेसाई आहे, असा दावा नितेश राणेंनी केला. 

वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यातील संभाषणाची माहिती एनआयएने घ्यावी. वरुण सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे याची माहिती एनआयएने घ्यावी. तसेच हे फोन कुणाच्या सांगण्यावरून हे फोन केले गेले. कुणी त्याला फोन करायला सांगितले, याची माहिती समोर आली पाहिजे. वाझेचे सीडीआर रिपोर्ट, व्हॉट्सअॅप कॉलचे रिपोर्ट असतील. वाझे आणि सरदेसाईमधील संभाषण तपासले पाहिजे. वाझेचं संभाषण तपासणं जमत नसेल तर वरुण सरदेसाईंचं संभाषण तपासा. या महिन्यात त्यांचं बोलणं झालं होतं का याची माहिती घ्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. 

Web Title: Sachin Vaze: Now Thackeray's relative's name in Sachin Vaze case, Nitesh Rane's sensational allegations against Varun Sardesai, demands inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.